Preeti Sudan News UPSC President Esakal
देश

Preeti Sudan: UPSC च्या अध्यक्षपदी प्रीती सुदान, कोरोना काळात देशाला सावरणाऱ्या यूपीएससीला पोखरणाऱ्या 'विषाणू'ला संपवतील?

Preeti Sudan: 1983 बॅचच्या IAS अधिकारी प्रीती सुदान यांची UPSC च्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

आशुतोष मसगौंडे

नवी दिल्ली : माजी केंद्रीय आरोग्य सचिव प्रीती सुदान यांची UPSC च्या अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्या 1983 च्या बॅचच्या IAS अधिकारी असून, त्या मनोज सोनी यांची जागा घेतील. मनोज सोनी यांनी त्यांचा कार्यकाळ संपण्यापूर्वी या महिन्याच्या सुरुवातीला राजीनामा दिला होता.

प्रीती सुदान 1 ऑगस्टपासून यूपीएससीच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत.

कोण आहेत प्रीती सुदान? Who is Preeti Sudan

प्रीती सुदान या 1983 च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी अर्थशास्त्रात M.Phil आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स (LSE) मधून सामाजिक धोरण आणि नियोजनामध्ये एमएससी केली आहे. आंध्र प्रदेशमधून त्यांनी प्रशासकीय सेवेला सुरूवात केली. २००८ पासून त्यांची केंद्रात नियुक्ती करण्यात आली.

UPSC वेबसाइटवर प्रीती सुदान यांच्या प्रोफाइलमध्ये असे लिहिले आहे की, "प्रीती सुदान यांनी जागतिक बँकेच्या सल्लागार म्हणून काम केले आहे. तंबाखू नियंत्रणावरील फ्रेमवर्क कन्व्हेन्शनच्या COP-8 चे त्या अध्यक्षा होत्या."

2022 मध्ये, माजी IAS अधिकारी प्रीती सुदान यांनी UPSC सदस्य म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली होती.

बेटी बचाओ बेटी पढाओ आणि आयुष्मान भारत यासह अनेक राष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये सुदान यांनी महत्त्वाचे योगदान दिले आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे नॅशनल मेडिकल कमिशन आणि ई-सिगारेटवरील बंदी यासारखे महत्त्वपूर्ण कायदे झाले.

कोरोनाच्या काळात चर्चेत

कोरोना महामारीच्या काळात प्रीती सुदान आरोग्य मंत्रालयात केंद्रीय सचिव पदावर कार्यरत होत्या. या कालावधीत त्या अनेकवेला चर्चेत आल्या होत्या.

प्रीती सुदान यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहून स्थलांतरित मजुरांची काळजी घेण्याची शिफारस केली होती. त्या जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) स्वतंत्र पॅनेलच्या सदस्य होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajiv Gandhi : अन् राजीव गांधी मुंबईतून गेले ते कायमचेच! राजभवनातील माजी अधिकाऱ्याने सांगितली शेवटच्या भेटीची आठवण

Beed Crime: सुरेश धस यांचे कार्यकर्ते आहोत, असं म्हणत एकाला बेदम मारहाण; शिरुरमध्ये नेमकं काय घडलं?

Rain-Maharashtra Latest Live News Update: माधुरी हत्तीची देखभाल करण्यासाठी विश्वस्तांच्या उपस्थित जागेची पाहणी

Jalgaon Crime : जळगावात कौटुंबिक वादातून धक्कादायक घटना; पतीने पत्नीवर कुऱ्हाडीने हल्ला करत संपवले जीवन

होम्बळे फिल्म्सने 'कांतारा: अध्याय 1' मध्ये गुलशन देवय्या यांची 'कुलशेखर' या भूमिकेत केली घोषणा

SCROLL FOR NEXT