मिस्कल झुमाबेवा  
देश

गर्भवतीच्या हत्याकांडाने खळबळ, मित्राच्या घरी सापडला मृतदेह

मिस्कल झुमाबेवा आणि तिचा एक वर्षाचा मुलगा मानसचा बिछान्यावर मृतदेह पडलेला होता. छातीवर आणि शरीराच्या अन्य भागांवर जखमा होत्या.

दीनानाथ परब

नवी दिल्ली: किर्गिस्तानातून (Kyrgyzstan) भारतात येऊन स्थायिक झालेली महिला आणि तिचा एक वर्षाचा मुलगा घरामध्ये मृतावस्थेत आढळले. दोघांची निर्घृणपणे हत्या (Murder) करण्यात आली. मिस्कल झुमाबेवा (२८) असे मृत महिलेचे नाव आहे. हत्येच्यावेळी ती एका मित्राच्या घरामध्ये (home) होती. दक्षिणपूर्व दिल्लीतील (delhi) कालकाजी भागामध्ये घरामध्ये मंगळवारी सकाळी दोघे मृतावस्थेत आढळले. पोलिसांनी ही माहिती दिली.

मिस्कल झुमाबेवा आणि तिचा एक वर्षाचा मुलगा मानसचा बिछान्यावर मृतदेह पडलेला होता. छातीवर आणि शरीराच्या अन्य भागांवर जखमा होत्या. मृत महिला पाच महिन्यांची गर्भवती होती. विनय चौहानसोबत तिचे लग्न झाले होते. ग्रेटर कैलाश येथे ती नवऱ्यासोबत राहत होती. या जोडप्याच्या लग्नाला दोनपेक्षाजास्त वर्ष झाली होती. त्यांना १३ महिन्यांचा एक मुलगाही आहे.

विनय चौहान यांचा गेस्ट हाऊसचा बिझनेस होता. घटना घडली, त्यावेळी महिला आणि तिचा मुलगा कालकाजी येथे मित्राच्या घरी होते. मित्रांनी मिस्कलच्या मृत्यूची बातमी दिल्यानंतर विनयने पीसीआर कॉल करुन पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे. आरोपींना शोधून हत्येचे कारण शोधून काढण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Makar Sankranti : एकादशीला संक्रांत आल्याने गोंधळू नका! तिळगूळ खायचा की नाही? ज्योतिषतज्ज्ञांनी दिला शास्त्राधार

IND vs NZ: कठीण प्रसंगी धावून आला KL Rahul! जेमिसनला सिक्स मारून शतक अन् मग लेकीसाठी स्पेशल सेलिब्रेशन; पाहा Video

Crime: लग्नात ४५ लाख खर्च, तरीही लोभ कायम; आधी हनिमून साजरा, नंतर पतीनं बोटीवर भयानक कट रचला, नवविवाहितेसोबत काय घडलं?

नाशिक येथे भरलेल्या तीन दिवसीय सत्ताविसाव्या अखिल भारतीय मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे रविवारी अकरा जानेवारी रोजी सूप वाजले

Latest Marathi News Live Update : दिल्लाच्या तीस हजारी न्यायालयाने दगडफेक प्रकरणात अटक केलेल्या ५ आरोपींचे जामीन अर्ज फेटाळून लावले

SCROLL FOR NEXT