new-parliment
new-parliment 
देश

नव्या संसदगृहाच्या बांधकामाची पूर्वतयारी सुरू

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली - नव्या संसदगृहाच्या प्रत्यक्ष बांधकामाची पूर्वतयारी सुरू करण्यात आली असून, या कामासाठी लागणाऱ्या पाण्यासाठी दहा मीटर खोलीचा एक हौद संसदगृहाच्या परिसरातच खोदण्यात आला आहे. त्याचे काम सध्या सुरू आहे. यासंदर्भातील ताज्या माहितीनुसार नव्या संसदगृहाच्या आराखड्यात काही बदल झाल्याचे समजले असून, संसदगृहासमोरील महात्मा गांधी यांचा आसनस्थ भव्य पुतळाही हलविला जाण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होण्याचा २०२२ मधील मुहूर्त मोदी सरकारने नव्या संसदगृहासाठी मुक्रर केला असला तरी करोना साथीमुळे ते वेळापत्रक विस्कळित होण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. पूर्वतयारीला नुकतीच सुरूवात होत आहे. त्यामुळे प्रत्यक्षातील बांधकाम, तसेच या परिसरात मोठ्या संख्येने असलेली झाडे, तसेच गांधी पुतळ्यासह अन्य नामांकितांचे पुतळे व त्यांची हलवाहलव या सर्वच गोष्टी लक्षात घेता अद्याप या कामाने अपेक्षित गती धारण केली नसल्याचेच आढळून येते.

आराखड्यात सध्याच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर असलेल्या महात्मा गांधी यांच्या मागच्या बाजूला असलेल्या पार्किंगचा भाग संसदेच्या नव्या वास्तूसाठी निश्‍चित करण्यात आला होता. ताज्या माहितीनुसार ‘अलाइनमेंट’ करताना महात्मा गांधी यांच्या पुतळ्याच्या पुढील भागही नव्या वास्तूच्या बांधकामात समाविष्ट होत असल्याचे समजते. याचा अर्थ महात्मा गांधी यांचा पुतळाही नव्या रचनेत हलविण्यात येईल अशी चर्चा आहे. हा बदल नव्याने झाल्याचे सांगण्यात येते. 

संसदगृहाच्या आवारात सध्या असलेल्या पुतळ्यांची संख्या पन्नासच्या आसपास आहे. अलीकडेच एका निर्णयानुसार संसदगृह परिसरात आता नव्याने पुतळा न उभारण्याचे ठरविण्यात आले आहे. त्यामुळे नव्या वास्तूत पुतळे नसतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तसेच आता जे पुतळे आहेत त्यांच्यासाठी एक संग्रहालय तयार करून तेथे त्यांची रवानगी करण्याचा सरकारचा मानस आहे. 

केंद्रीय सचिवालयही हलविणार?
सरकारने राष्ट्रपती भवनासमोरच्या संसदगृहासह सर्व प्रशासकीय व विविध मंत्रालये असलेल्या ‘सेंट्रल व्हिस्टा’ परिसराची फेररचना करण्याचे ठरविले असून त्यानुसार केंद्रीय सचिवालयही देखील राष्ट्रपती भवन परिसरातून हलवून सध्या राजपथावर इंडिया गेट जवळ असलेल्या इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राच्या स्थानावर उभारण्यात येणार आहे. राष्ट्रीय कलाकेंद्राचे येथून उच्चाटन केले जाणार आहे. थोडक्‍यात या परिसराचे मूळ सौंदर्य बदलण्याची ही योजना आहे. यामध्ये शेकडो झाडे नष्ट होण्याची शक्‍यता असून सध्याचा मोकळा परिसर इमारतींनी भरणार आहे.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK : जडेजाची अष्टपैलू कामगिरी, चेन्नईचा पंजाबवर विजय

Rohit Pawar Video : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT