Droupadi Murmu  esakal
देश

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींचा देशवासियांकडे आग्रह,"त्यांनी महिला सशक्तीकरणाला प्राथमिकता द्यावी"

आज भारताच्या महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपले कतृत्व सिद्ध केलंय. हे दशक महिलांच्या विकासासाठी महत्वपूर्ण ठरलं.

सकाळ डिजिटल टीम

भारताला स्वातंत्र्य मिळून ७६ वर्ष पूर्ण झाले. या काळात भारताने शून्यातून सुरवात करत देशाची अर्थव्यवस्था मजबूत केली. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशासाठी एक संदेश दिलाय. त्यांनी या संदेशात महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणावर भर दिलाय. आर्थिक सशक्तीकरणामुळे कुटुंबात आणि समाजात महिलांची स्थिती मजबूत होते, असे मत राष्ट्रपती मुर्मूंनी व्यक्त केले. मुलींनी धाडसाने पुढे जाण्याची जावं, अशी इच्छा राष्ट्रपतींनी व्यक्त केली.

आज भारताच्या महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपले कतृत्व सिद्ध केलंय. हे दशक महिलांच्या विकासासाठी महत्वपूर्ण ठरलं.

देशाला संदेश देताना राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या की,"आज महिला विकास आणि देश सेवेच्या प्रत्येक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात योगदान देत आहेत आणि देशाचा गौरव वाढवतं आहेत. आज आपल्या महिलांनी अशा अनेक क्षेत्रामध्ये आपले विशेष स्थान निर्माण केलंय, जिकडे काही दशकांआधी त्यांच्या सहभागाचा कल्पनाही केली गेली नसती. (Latest Marathi News )

मला हे बघून आनंद होतोय की, महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणावर विशेष लक्ष दिलं जातय. आर्थिक सशक्तीकरणामुळे कुटुंबात आणि समाजात महिलांची परिस्थिती मजबूत होते. मी देशवासीयांना आग्रह करते की त्यांनी महिला सशक्तीकरणाला प्राथमिकता द्यावी. माझी इच्छा आहे की आपल्या माता भगिनी आणि मुलींनी प्रत्येक अडचणींचा सामना धाडसाने करुन जीवनात पुढे जावं."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT