Droupadi Murmu 
देश

Droupadi Murmu: सुरीनामचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळवणाऱ्या द्रौपदी मुर्मू पहिल्या भारतीय महिला

भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सुरीनामचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला

धनश्री ओतारी

भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सुरीनामचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. सुरीनाम प्रजासत्ताकचे अध्यक्ष चंद्रिका प्रसाद संतोखी यांनी सोमवारी त्यांना 'द ग्रँड ऑर्डर ऑफ द चेन ऑफ यलो स्टार' पुरस्कार प्रदान केला. हा पुरस्कार मिळवणाऱ्या राष्ट्रपती मुर्मू पहिल्या भारतीय महिला आहेत.

मला खूप सन्मान वाटत आहे. हे केवळ माझ्यासाठीच नाही तर भारतातील 140 कोटी लोकांसाठीही खूप महत्त्वाचे आहे. अशी भावना मुर्मू यांनी यावेळी व्यक्त केली. (Latest Marathi News)

दोन्ही देशांमध्ये 4 सामंजस्य करार

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सोमवारी राष्ट्रपती भवनात संतोखी यांची भेट घेतली. दोघांमध्ये शिष्टमंडळ स्तरावरही चर्चा झाली. यानंतर दोन्ही देशांदरम्यान 4 सामंजस्य करार करण्यात आले. हे सामंजस्य करार आरोग्य, कृषी आणि क्षमता निर्माण क्षेत्रात करण्यात आले आहेत.(Latest Marathi News)

अर्ली फ्लड वॉर्निंग सिस्टीम'ला मंजुरी

भारताप्रमाणेच सुरीनाममध्येही अनेक जाती, धर्म आणि भाषांचे लोक राहतात. भारत आणि सुरीनाममधील मैत्री ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंधांवर आधारित आहे. मात्र, दोन्ही देशांमधील व्यापार क्षमतेपेक्षा खूपच कमी आहे. द्विपक्षीय व्यापार वाढवण्यासाठी सहकार्य वाढवण्याची गरज आहे. संरक्षण, आयुर्वेद आणि फार्मा क्षेत्रातील सहकार्य आणखी वाढवता येईल.(Latest Marathi News)

भारत सुरीनामच्या मानवी संसाधनांमध्ये तांत्रिक सहकार्य आणि कौशल्य विकास वाढवण्यासाठी वचनबद्ध आहे. जलद प्रभाव प्रकल्पांना चालना देऊन सुरीनामच्या सामाजिक-आर्थिक विकासात भागीदारी करण्यास भारत तयार आहे. भारत-UNDP निधी अंतर्गत सुरीनामने विकसित केलेल्या 'अर्ली फ्लड वॉर्निंग सिस्टीम'ला मंजुरी मिळाल्याबद्दलही त्यांनी आनंद व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gyanesh Kumar Resignation : कॉकरोच जनता पार्टी निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात रस्त्यावर उतरणार; गांधी जयंतीला देशव्यापी आंदोलनाचा इशारा

Drought in Maharashtra : दुष्काळाच्या झळा; दोन शेतकऱ्यांनी गमावला जीव, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

२४ किलो वजन घटवलं! वनिता खरातने सांगितलं डाएटचं सीक्रेट; म्हणाली, ‘आज माझा चीट डे’

Maharashtra Ganesh Visarjan Live: मिरजेतील पहिल्या गणपतीचे विसर्जन; नदीवेस शिवाजी गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकीसाठी गणेश तलावावर जय्यत तयारी

Soybean Crop: व्यथित शेतकऱ्याने पेटवून दिले सोयाबीनचे पीक

SCROLL FOR NEXT