President Election 2022 draupadi murmu get record votes from maharashtra shiv sena support sakal
देश

द्रौपदी मुर्मु यांना महाराष्ट्रातून बंपर मतांचे पीक!

राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत भाजप आघाडीच्या उमेदवार द्राउपदी मुर्मु यांच्या विजयात महाराष्ट्राने ठळक वाटा उचलल्याचे स्पष्ट झाले

मंगेश वैशंपायन

नवी दिल्ली : राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत भाजप आघाडीच्या उमेदवार द्राउपदी मुर्मु यांच्या विजयात महाराष्ट्राने ठळक वाटा उचलल्याचे स्पष्ट झाले आहे. मुर्मु यांना महाराष्ट्र विधानसभेतून तब्बल 181 मते मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी यशवंत सिन्हा यांना 98 मते मिळाली. या निवडणुकीत राज्यातून 283 आमदारांनी मतदान केले होते. यांना 3 लाख 16 हजार 75 तर सिन्हा यांना एक लाख 71 हजार पन्नास इतके मतमूल्य मिळाल्याचे दिसत आहे. शिवसेनेने या निवडणुकीत मुर्मू यांना पाठिंबा दिला होता. राज्यसभा सचिवालयाच्या सुत्रांनी आज रात्री सकाळ ला दिलेल्या प्रारंभिक माहितीनुसार मुरगूड यांना 181 मते मिळाली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत विश्वासदर्शक ठरावावर भाषण करताना 2024 मध्ये शिवसेना म्हणजेच आपला गट आणि भाजपा मिळून विधानसभेत 200 जागा मिळतील असा जो विश्वास व्यक्त केला होता, सार्थ करणारा पहिला आकडा राष्ट्रपतीपदाच्या मतदानातून समोर आल्याचे जाणकार मानतात. महाराष्ट्र विधानसभेत 288 आमदार आहेत. प्रारंभिक माहितीनुसार जो आकडा समोर येतो त्यानुसार मतदान केलेल्या आमदारांची संख्या 279 इतकी होते. भाजप व विरोधकांचे काही आमदार मतदानास उपस्थित राहू शकले नव्हते, या परिस्थितीत उर्वरित नऊ आमदारांची मते बाद झाली का , हे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Rain-Maharashtra Latest Live News Update: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर

CM Devendra Fadnavis : डेटा, एआय व क्वांटम कॉम्प्युटिंगमुळे उत्तम मनुष्यबळ निर्माण होणार

Selu News : पुरात वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह सापडला; दुसऱ्याचा शोध सुरू

VIDEO : रेल्वे पुलासाठी खोदलेल्या खड्ड्यात चार मुलं बुडाली; चौघांची प्रकृती चिंताजनक...यवतमाळमधील घटना, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT