ramnath kovind
ramnath kovind 
देश

राष्ट्रपतींकडून दिल्ली विद्यापीठाच्या कुलगुरुंवर निलंबनाची कारवाई

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिल्ली विद्यापीठाचे व्हिजिटर म्हणून असलेल्या अधिकाराचा वापर करत कुलगुरुंवर कारवाई केली आहे. दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरु प्राध्यापक योगेश त्यागी यांनी निलंबित करण्यात आलं आहे. त्यांच्याविरोधात कर्तव्यात कसूर केल्याच्या आरोपांची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहे. शिक्षण मंत्राल्याच्या कथित प्रशासकिय त्रुटींच्या प्रकऱणी दिल्ली विद्यापीठाच्या कुलगुरुंविरोधात चौकशीसाठी राष्ट्रपतींनी मंजूरी दिली आहे.

विद्यापीठाचे कुलपती राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंगळवारी त्यांची मजुरी पाठवली आहे. त्यागींविरोधात चौकशीच्या प्रस्तावाला राष्ट्रपती कार्यालयाकडून परवानगी देण्यात आली आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यागींना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे.

त्यागी दोन जुलैरोजी एम्समध्ये दाखल झाले होते. तेव्हापासून ते सुट्टीवर आहेत. सरकारने 17 जुलैरोजी त्यागी पुन्हा परत येईपर्यंत पीसी जोशी यांच्याकडे प्रभारी कुलगुरुपद  सोपवण्यात आलं होतं. 

गेल्या आठवड्यात त्यागी यांनी केलेल्या हस्तक्षेपामुळे वाद निर्माण झाला होता. त्यागी यांनी पीसी जोशी यांना प्रभारी कुलगुरुपदावरून हटवलं होतं. त्यानंतर विद्यापीठाच्या नॉन कॉलेजिएट वुमेन्स एज्युकेशन बोर्डाच्या संचालक गीता भट्ट यांची नियुक्ती केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

MI vs KKR Live IPL 2024 : अय्यरची 70 धावांची खेळी, मुंबईसमोर विजयासाठी 170 धावांच आव्हान

SSC-HSC Result 2024 : सीबीएसईचा दहावी-बारावीचा निकाल २० मे नंतर होणार जाहीर

West Indies T20 WC 24 Squad : विंडीजच्या संघात सगळे स्टार मात्र इन फॉर्म जादूगारच मिसिंग

Latest Marathi News Live Update : ...तर मोदींबरोबर गेलेलं का चालत नाही- अजित पवार

SCROLL FOR NEXT