ramnath kovind 
देश

राष्ट्रपती कोविंद यांच्यावर मोतीबिंदू शस्त्रक्रिया; रुग्णालयातून डिस्चार्ज

यापूर्वी झाली होती बायपास सर्जरी

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind) यांच्यावर गुरुवारी मोतीबिंदू शस्त्रक्रिया (cataract surgery) झाली. ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्जही देण्यात आला आहे. राष्ट्रपती भवनाकडून (Rashtrapati Bhavan) याची माहिती देण्यात आली.

राष्ट्रपती भवनाकडून सांगण्यात आलं की, भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यावर गुरुवारी नवी दिल्लीतील सैन्य रुग्णालयात (रेफरल अँड रिसर्च) मोतीबिंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून यानंतर त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

राष्ट्रपतींवर ३० मार्च रोजी झाली होती बायपास सर्जरी

यापूर्वी ३० मार्च रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यावर बायपास सर्जरी करण्यात आली होती. यांतर १२ एप्रिल रोजी त्यांना एम्समधून सुट्टी देण्यात आली. २६ मार्च रोजी राष्ट्रपती कोविंद यांच्या छातीमध्ये दुखत होतं. त्यामुळे त्यांना दिल्लीतील आर्मी हॉस्पिटलमध्ये (रिसर्च अँड रेफरल) उपचारांसाठी दाखल करण्यात आलं.

या ठिकाणी त्यांचं रुटीन चेकअप झालं. यानंतर डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारांसाठी एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं. यानंतर २७ मार्च रोजी त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आलं नतर त्यांच्यावर ३० मार्च रोजी यशस्वी बायपास सर्जरी झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT