AAP Support Yashwant Sinha in Presidential Election AAP Support Yashwant Sinha in Presidential Election
देश

राष्ट्रपती निवडणूक : आप विरोधकांसोबत; यशवंत सिन्हांना पाठिंबा जाहीर

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : राष्ट्रपती निवडण्यासाठी (Presidential Election) सोमवारी (१८ जुलै) मतदान होणार आहे. मतदानापूर्वी राष्ट्रपतीपदाचे उमेदवार तसेच सत्ताधारी आणि विरोधी पक्ष सक्रिय झाले आहेत. अधिक पाठिंबा मिळवण्यासाठी दोन्ही बाजूंनी प्रयत्न सुरू आहेत. अशात दिल्ली आणि पंजाबमध्ये सत्तेत असलेल्या आम आदमी पक्षाचा (AAP) पाठिंबा विरोधी पक्षांना मिळाला आहे. ही विरोधकासाठी आनंदाची बातमी आली. (AAP Support Yashwant Sinha in Presidential Election)

आम आदमी पक्षाने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत (Presidential Election) विरोधी पक्षाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. आपचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी शनिवारी (ता. १५) यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) यांना पाठिंबा जाहीर केला आहे. आम्ही एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचा आदर करतो. परंतु, यशवंत सिन्हा यांच्या बाजूने मतदान करू, असे संजय सिंह म्हणाले.

झारखंड मुक्ती मोर्चा आणि बिजू जनता दल या पक्षांनी एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला आहे. तर यशवंत सिन्हा यांना आम आदमी पक्षाने (AAP) पाठिंबा जाहीर केला आहे. एनडीएमध्ये सहभागी पक्षांव्यतिरिक्त सुहेलदेव भारतीय समाज पार्टी, बहुजन समाज पार्टी, वायएसआर काँग्रेस, टीडीपी, जनता दल (एस), शिरोमणी अकाली दल, यूडीपी यांनीही एनडीए उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

आप हा एकमेव बिगर-भाजपा, बिगर-काँग्रेस पक्ष आहे ज्याची सरकारे दिल्ली आणि पंजाब या दोन राज्यात आहेत. आपचे दोन्ही राज्यांतून १० राज्यसभा खासदार आहेत. त्यापैकी तीन दिल्लीचे आहेत. तसेच पक्षाचे पंजाबमध्ये ९२, दिल्लीत ६२ आणि गोव्यात दोन आमदार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT