Presidential Election esakal
देश

राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत आमदारांना दिली लाच; काँग्रेसची मुर्मू यांच्याविरुध्द तक्रार

भाजपनं आपल्या आमदारांना लाच दिल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय.

सकाळ डिजिटल टीम

भाजपनं आपल्या आमदारांना लाच दिल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय.

Presidential Election : कर्नाटकातील काँग्रेसनं (Karnataka Congress) मंगळवारी निवडणूक आयोगाकडं (Election Commission) राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) आणि इतरांविरुद्ध 18 जुलै रोजी झालेल्या निवडणुकीत कायद्याच्या तरतुदींचं उल्लंघन केल्याचा आरोप करत तक्रार दाखल केलीय.

17 आणि 18 जुलै रोजी कर्नाटकातील सत्ताधारी भाजपनं आपल्या आमदारांना लाच दिल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय. काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते सिद्धरामय्या (Siddaramaiah) आणि प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार (DK Shivakumar) यांनी त्यांच्या तक्रारीत म्हटलंय, मतदार आमदारांना पंचतारांकित हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी एनडीएच्या उमेदवार (मुर्मू), मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai), भाजपचे प्रदेशाध्यक्ष नलिन कुमार कटील, ज्येष्ठ भाजप नेते बीएस येडियुरप्पा, सतीश रेड्डी आणि भाजपच्या नेत्यांनी आमदारांना लाच दिली. शिवाय, आमदारांना येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये बोलावून राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मतदान करताना प्रशिक्षण सत्राच्या नावाखाली आमदारांना आलिशान खोल्या, भोजन, मद्य, पेये, मनोरंजनाची सोय करण्यात आली होती, असा आरोपीही त्यांनी केलाय.

18 जुलै रोजी सकाळी जवळपास सर्व मंत्री, आमदार आणि इतर वरिष्ठ भाजप नेते हॉटेलमधून विधानसौधला बंगळुरू महानगर परिवहन महामंडळाच्या बसमधून आले. भाजप नेत्यांची ही सर्व कृत्ये मतदारांना किंवा आमदारांना लाच देणे आणि निवडणूक जिंकण्याची शक्यता वाढवण्यासाठी होती, असंही आरोपात म्हटलंय. काँग्रेस नेत्यांनी निवडणूक आयोगाला एनडीएच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू, बोम्मई, येडियुरप्पा, कटील आणि रेड्डी यांनी केलेल्या निवडणूक गुन्ह्यांची दखल घेण्याचं आवाहन केलंय. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडणूक कायदा, 1952 तसेच भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांतर्गत त्यांच्याविरुद्ध फौजदारी खटला दाखल करण्याची मागणीही करण्यात आलीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Municipal Election : नाशिक महापालिकेत आघाडीत बिघाडी? मनसेच्या एन्ट्रीवरून शिवसेना-काँग्रेसमध्ये जुंपली!

Kalyan Traffic: कल्याणमध्ये वाहतुकीत बदल! 'हा' महत्त्वाचा पूल २० दिवस बंद, काय असतील पर्यायी मार्ग?

Hrithik Roshan Uttarakhand Trek: हृतिक रोशनने अनुभवला उत्तराखंडच्या डोंगरांचा निसर्गमय ट्रेक; चाहत्यांनी विचारलं ‘जादू मिला क्या?

तरुणी नशेत बेधूंद होऊन घरी आली, घरमालकानं पाहिलं अन् मागून येऊन...; पीजी मालकाचं भयंकर कृत्य; पुणे हादरलं

Ichalkaranji Pollution : औद्योगिक प्रगतीच्या सावलीत इचलकरंजीचा श्वास कोंडतोय; वायू प्रदूषणाने आरोग्याचा गंभीर इशारा

SCROLL FOR NEXT