यशवंत सिन्हा 
देश

राष्ट्रपतीपदाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना 'झेड' श्रेणीची सुरक्षा

NDA च्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : राष्ट्रपतीपदाचे विरोधी पक्षाचे उमेदवार यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) यांना केंद्र सरकारने केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) कमांडोजची 'झेड' श्रेणीची (Z Security) सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी शुक्रवारी दिली आहे. (Presidential Election News )

केंद्रीय गृहमंत्रालयाकडून सीआरपीएफच्या (CRPF) व्हीआयपी सुरक्षा शाखेला सिन्हा (84) यांच्या सुरक्षेचे आदेश देण्यात आल्यानंतर सिन्हा यांच्या सुरक्षेची जबाबदारी सीआरपीएफच्या जवानांनी स्वीकारली आहे. सिन्हा यांच्याशिवाय केंद्राने एनडीएच्या राष्ट्रपतीपदासाठीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) यांनाही झेड प्लस श्रेणीची सुरक्षा देण्यात आली आहे.

दरम्यान, NDA च्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मुर्मू यांनी संसद भवनातील राज्यसभेच्या महासचिवांच्या कार्यालयात अर्ज दाखल केला आहे. तर, सिन्हा 27 जून रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे सांगितले जात आहे. राष्ट्रपतीपदाची निवडणूक 18 जुलै रोजी होणार असून मतमोजणी 21 जुलै रोजी होणार आहे. देशाचे सध्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ram Nath Kovind) यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपणार असून, एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना अनेक राजकीय पक्षांचा पाठिंबा मिळाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam Water Level : ...अखेर दिलासादायक बातमी! तळ गाठणारे कोयना धरण पुन्हा भरणार; महाबळेश्वर-नवजातील पावसाने पाणीसाठ्यात मोठी वाढ, पाहा ताजी आकडेवारी

अभिनेत्रीसोबत भररस्त्यात गैरवर्तन; बहिणीसमोरच अनोळखी व्यक्तीचं लाजिरवाणं कृत्य, अभिनेत्रीने सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाळी वाजवा आंदोलन

T20 Series : वैभव सूर्यवंशीचं आज पदार्पण? कुणाला बाहेर बसवणार? इंग्लंडविरुद्ध पहिला टी२० सामना, भारताची परीक्षा

Mumbai Local: माकडाच्या हट्टापुढे रेल्वेही थांबली! बोरिवलीत रेल्वे वाहतूक विस्कळीत

SCROLL FOR NEXT