देश

तीरथ सिंह रावतच मुख्यमंत्रीपदी; राजीनाम्याबाबत वाच्यता नाही!

विनायक होगाडे

डेहराडून : उत्तराखंड सरकारमध्ये मोठा उलटफेर होण्याचे संकेत मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी दिले होते. माध्यमांमध्ये देखील ते राजीनामा देणार आहेत, अशा चर्चा सुरु होत्या. त्यांनी राजीनामा देण्याची तयारी दाखवली होती. केंद्रीय नेत्याकडून त्याला हिरवा कंदील मिळाल्यास उत्तराखंडला पुन्हा एकदा नवा मुख्यमंत्री मिळण्याच्या शक्यता होत्या. राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून धनसिंह रावत आणि सतपाल महाराज यांचे नाव चर्चेत होते. यावर्षीच त्रिवेंद्रसिंह रावत यांच्या जागी ते मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले होते. त्यांना या पदावर येऊन चार महिने देखील पूर्ण झाले नाहीयेत. त्यांनी शुक्रवारी साडेनऊ वाजता पत्रकार परिषद घेतली. मात्र, त्यांनी राजीनाम्याबाबत कसलीही वाच्यता केली नाही. त्यामुळे सध्यातरी त्यांच्या राजीनाम्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

याआधी उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी गेल्या मार्च महिन्यात राजीनामा दिला होता. त्यांच्याबाबत भाजप आमदारांमध्ये नाराजीचा सूर होता. यामुळे अखेर रावत यांना राजीनामा द्यावा लागला असून पत्रकार परिषदेत राजीनामा दिल्याची माहिती त्यांनी दिली होती. पक्षाने याबाबतचा निर्णय घेतला असून मला चार वर्षे राज्याची सेवा करण्याची संधी दिली असंही ते म्हणाले होते.

कोण आहेत तीरथ सिंह रावत?

तीरथ सिंह रावत फेब्रुवारी 2013 ते डिसेंबर 2015 पर्यंत उत्तराखंड भाजप प्रदेश अध्यक्ष होते. ते चौबट्टाखालमधून आमदार (2012-2017) राहिले आहेत. सध्या ते भाजपचे राष्ट्रीय सचिव आणि गढवाल लोकसभेतून खासदार आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना हिमाचल प्रदेशचा प्रभारीही बनवण्यात आलं होतं. 2000 मध्ये स्थापन झालेल्या उत्तराखंडचे ते पहिले शिक्षामंत्री होते. 2012 मध्ये ते चौबट्टाखाल विधानसभा मतदारासंघातून निवडले गेले. 2013 मध्ये त्यांच्याकडे उत्तराखंड भाजप प्रदेशाध्यक्षची जबाबदारी आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Property Tax: पुणे महानगरपालिकेत भाजपने करमाफीचा शब्द फिरवला; ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना टॅक्स माफी नाही

Gas Cylinder Shortage : छत्रपती संभाजीनगर तालुक्यात ग्रामीण भागात गॅस टंचाई; लग्नसमारंभ व हॉटेल व्यवसाय अडचणीत, अनेक हाँटेल गॅसअभावी बंद

Latest Marathi News Live Update: श्रीनगरच्या मालपोरा भागात दोन निवासी घरांना आग लागली

Theur Fraud News : लँड डेव्हलपरला मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून १२ कोटींचा घातला गंडा

Pachod News : केकत जळगाव येथे कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT