Loksabha Election 2024 esakal
देश

Loksabha Election 2024 : अमेठी, रायबरेलीसाठी गांधी कुटुंबीयांवर दबाव

उत्तरप्रदेशातील ‘इंडिया’ आघाडीत काँग्रेसच्या वाट्याला १७ लोकसभा मतदारसंघ आले आहेत

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : उत्तरप्रदेशातील रायबरेली व अमेठी या दोन्ही काँग्रेसच्या परंपरागत लोकसभा मतदारसंघातून यावर्षी गांधी कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी द्यावी, यासाठी कार्यकर्त्यांकडून दबाव वाढत आहे.

उत्तरप्रदेशातील ‘इंडिया’ आघाडीत काँग्रेसच्या वाट्याला १७ लोकसभा मतदारसंघ आले आहेत. यापैकी १३ मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा काँग्रेसने केली आहे. परंतु चार मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा अद्यापही केलेली नाही. यात रायबरेली, अमेठी, मथुरा व अलाहाबाद (प्रयागराज) या मतदारसंघांचा समावेश आहे. यापैकी रायबरेली व अमेठी हे गांधी कुटुंबीयांचे पारंपारिक मतदारसंघ आहेत. रायबरेलीतून सोनिया गांधी निवडणूक लढणार नसल्याने या मतदारसंघात कोण उमेदवार राहणार हे स्पष्ट झालेले नाही. समाजवादी पक्षाशी चर्चा करताना माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी हे दोन्ही मतदारसंघ केवळ गांधी कुटुंबीयांसाठी सोडू. काँग्रेसचा इतर उमेदवार येथे चालणार नाही, असे स्पष्ट केले होते.

प्रियांकाची रायबरेलीत रॅली

उत्तर प्रदेशातील या मतदारसंघांबाबत काँग्रेसने अद्यापही मौन सोडलेले नाही. उत्तरप्रदेश काँग्रेस समितीने गांधी कुटुंबीयांवर निष्ठा प्रकट करीत या दोन्ही मतदारसंघात गांधी कुटुंबातील उमेदवार असावा, असा प्रस्ताव पारित केला आहे. हा प्रस्ताव काँग्रेस समितीकडे पाठविण्यात आला आहे. गांधी कुटुंबातील सदस्य निवडणूक रिंगणात नसल्यास उत्तरप्रदेशातील इतर मतदारसंघावर त्याचा परिणाम होईल, असा कार्यकर्त्यांचा होरा आहे. एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात प्रियांका गांधी यांची रायबरेलीत प्रचार रॅली आयोजित करण्याचे ठरविण्यात आले आहे. यासाठी स्थानिक नेत्यांना तयारी करण्याचे निर्देश दिल्याचे समजते.

योग्यवेळी निर्णय: पांडे

प्रियांका गांधी रायबरेली व अमेठीतून राहुल गांधी लढणार काय, अशी विचारणा केल्यानंतर प्रभारी अविनाश पांडे यांनी बोलताना ही शक्यता नाकारली नाही. या मतदारसंघातील निवडणुकीला अजूनही वेळ असल्याने याबाबत काँग्रेस योग्यवेळी निर्णय घेईल, असेही पांडे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd T20I: टीम इंडियाचे घालीन लोटांगण! इंग्लंडने ७६ धावांवर श्रेयस अय्यरच्या संघाला गुंडाळले; फलंदाज तोंड लपवताना दिसले

IND vs ENG 3rd T20I: २० चेंडूंत ५ विकेट्स! वैभव सूर्यवंशी बघा कसा OUT झाला! इंग्लंडने सापळा रचून करेक्ट कार्यक्रम केला.. Video

Argentina vs Egypt: थरार, थरार, थरार... मेस्सीची पेनल्टी हुकली तरीही अर्जेंटिनाने पिछाडीवरून मुसंडी मारली; १३ मिनिटांत मॅच फिरवली

IND vs ENG 3rd T20I: फिल सॉल्टची तुफान फटकेबाजी, इंग्लंडचे भारतासमोर तगडे लक्ष्य... प्रिंस यादव, हर्षित राणा चमकले पण...

FDA Raid : दूग्ध प्रक्रिया उद्योगावर FDAचा छापा; भेसळयुक्त दूध केले जप्त

SCROLL FOR NEXT