देश

सिंधूताईंच्या जाण्यानंतर पंतप्रधान मोदीही भावूक; म्हणाले...

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली: अनाथांसाठी सेवाकार्य करणाऱ्या भारतीय सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkal) यांचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या 75 वर्षांच्या होत्या. रात्री 8 वाजून 10 मिनिटांनी त्यांचं निधन झालंय. सिंधूताईंना 2021 साली पद्मश्री पुरस्कार मिळाला होता. ज्येष्ठ समाजसेविका पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्यावर उद्या शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दिल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही सिंधूताईंना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी ट्विट करत म्हटलंय की, डॉ. सिंधुताई सपकाळ यांनी केलेल्या समाजसेवेसाठी त्या नेहमी स्मरणात राहतील. त्यांच्या या प्रयत्नांमुळे अनेक अनाथ मुले चांगल्या दर्जाचं आयुष्य जगू शकली. त्यांनी उपेक्षित समुदायांमध्येही खूप काम केलंय. त्यांच्या निधनानं मला अतिव दु:ख झालं आहे. त्यांच्या कुटुंबियांना आणि चाहत्यांच्या माझ्याकडून संवेदना... ओम शांती....

सिंधुताईंच्या निधनाची बातमी धक्कादायक आहे. आईच्या ममतेनं हजारो अनाथांचा सांभाळ करणारी ती मातृदेवताच होती. त्यांच्या अचानक जाण्यानं समाजसेवेतील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आपल्यातून हरपले आहे अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाबद्दल भावना व्यक्त केल्या आहेत. सिंधुताईंनी निराधारांना आधार दिला. त्याचबरोबर शिक्षणाच्या माध्यमातून अनेकांना उभे केले. विशेषत: मुलींचे शिक्षण आणि त्यांनी स्वावलंबी व्हावे यासाठीचे त्यांचे योगदान महाराष्ट्र विसरू शकणार नाही अशी श्रद्धाजंली मुख्यमंत्र्यांनी वाहिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऐनवेळी पायलट का बदलले? मुंबईत CCTVमध्ये काय दिसलं? अजितदादांच्या अपघात प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी सगळंच सांगितंल

Madha News : माढ्याचा आठवडा बाजार आता हायटेक आणि शिस्तबद्ध! कार्यकर्त्यांच्या 'फिल्डिंग'मुळे वाहतूक कोंडीला ब्रेक, महिला व वृद्धांकडून कौतुक

राज्य सरकारची मोठी घोषणा! २६ आणि २७ मार्चला रामनवमीनिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण कुणाला? जाणून घ्या...

Madha News : माढ्याचा पाण्याचा प्रश्न सुटणार! ५२ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेसाठी नगराध्यक्षा मीनल साठे यांचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना साकडे

कर्नाटकला अधिकारच नाही, ही तर महाराष्ट्राची मानहानी; अजित पवार अपघात प्रकरणी FIR वर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

SCROLL FOR NEXT