देश

यंदा जम्मूतील नौशेरामध्ये PM मोदींची सैन्यासोबत दिवाळी

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आपली दिवाळी सैनिकांसोबत साजरी करतात. नेहमीप्रमाणे ते या दिवाळीला देखील हा पायंडा सुरु ठेवणार आहेत. दिवाळी साजरी करण्यासाठी ते आता जम्मूमधील नौशेरामध्ये पोहचले आहेत. पंतप्रधान मोदी राजौरी जिल्ह्यातील नौशेरामध्ये सैनिकांसमवेत दिवाळीचा उत्साह द्विगुणित करणार आहेत. 2019 मध्ये 370 कलम हटवल्यानंतर गेल्या वर्षी पंतप्रधान मोदी दिवाळीच्या निमित्ताने राजौरी जिल्ह्यातील सैनिकांसमवेत दिवाळी साजरी केली होती.

याआधी देखील सैन्यासोबत दिवाळी

पंतप्रधान मोदी प्रत्येक वर्षी सैन्यासोबत दिवाळी साजरी करण्यासाठी सीमाभागात जातात. तिथे त्यांच्यासोबत वेळ घालवतात. मिठाई वाटतात. याआधी देखील मोदींनी जम्मू-काश्मीर, उत्तराखंड आणि इतर ठिकाणी सैन्यासोबत दिवाळी साजरी केली आहे.

2016 मध्ये पंतप्रधान मोदींनी उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील भारत-चीन सीमेवरील माणामध्ये तैनात असलेल्या भारतीय तिबेट सीमा पोलिस (ITBP) सैन्यासोबत दिवाळी साजरी केली होती. 2017 साली पंतप्रधान मोदींनी जम्मू-काश्मीरमधील गुरेज सेक्टरमध्ये तैनात सैनिकांसोबत आनंदाने दिवाळी साजरी केली होती. याचप्रमाणे 2018 मध्ये पंतप्रधान मोदींनी उत्तराखंडमध्ये चीनच्या सीमेवरील सैन्यासोबत दिवाळी साजरी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT