देश

भारताने जगाला आशेचा पुष्पगुच्छ भेट दिलाय: PM मोदी

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी आज सोमवारी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (World Economic Forum) दावोसला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संबोधित केले. या संबोधनात त्यांनी भारत हा आशेच्या बुके असल्याचं प्रतिपादन केलं आहे. करोडो भारतीयांचं कोरोना व्हायरस विरूद्धच्या लढ्यासाठी यशस्वीरित्या लसीकरण केल्याचा उल्लेख करत त्यांनी 21 व्या शतकातील आव्हानांना तोंड देण्यासाठी लोकशाही आणि तंत्रज्ञानावरील भारताचा असलेला विश्वास याबद्दलही मत व्यक्त केले.

पंतप्रधान मोदींनी म्हटलंय की, आज भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वांत मोठा फार्मा उत्पादक देश आहे. कोरोनाच्या काळात आपण पाहिलंय की कशाप्रकारे 'एक पृथ्वी, एक आरोग्य' या संकल्पनेला अनुसरून भारताने अनेक देशांना आवश्यक औषधे आणि लस देऊन कोट्यवधी लोकांचे जीवन वाचवलं आहे आणि वाचवत आहे.भारत सध्या स्वातंत्र्याची 75 वे वर्ष साजरे करत आहे. आणि देशात 156 कोटी लस डोसदेखील देण्यात आले आहेत. भारताने जगाला एकप्रकारे आशेचा बुकेच भेट दिला आहे. या बुकेमध्ये, आम्हा भारतीयांचा आमच्या लोकशाहीवर अतूट विश्वास आहे, भारतीयांकडे 21व्या शतकाला सक्षम बनवण्याचे तंत्रज्ञान आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chiplun Crime : प्रेयसीसाठी मृतदेहाची लावली विल्हेवाट? हाडांच्या तुकड्यांनी उघड केलं 4 लाखांच्या बदल्याचं भयंकर गुपित, मुंबईतील महिलेला अटक

'ते ज्येष्ठ आहेत म्हणून मी घाबरलं पाहिजे असं...' प्रसिद्ध अभिनेत्री नाना पाटेकरांबद्दल बोलताना म्हणाली...'मी कोणालाच घाबरत...'

Latest Marathi News Live Update : किल्ले रायगडावरील शिवसमाधी परिसरात लावलेला अनधिकृत बोर्ड रायगड जिल्हाध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी काढून टाकला

College Student Death : शिक्षणाला कंटाळून सावंतवाडीत 17 वर्षीय विद्यार्थ्यानं गॅलरीतून उडी मारून संपवलं आयुष्य; चिठ्ठीतील मजकुराने उडाली खळबळ

High Court: आधी सेक्स नंतर ब्लॅकमेल... असंच सुरू राहीलं तर सुसंस्कृत समाजात राहणे कठीण; हायकोर्टाने दिले कारवाईचे आदेश!

SCROLL FOR NEXT