Vasundhara Raje 
देश

Rajasthan BJP: वसुंधरा राजेंना धक्का; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कोण असेल मुख्यमंत्रीपदाचा चेहरा

कार्तिक पुजारी

जयपूर- राजस्थानमध्ये भाजपचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण असेल यावरुन बरीच चर्चा सुरु आहे. या प्रश्नावरुन भाजप पक्षामध्येही बरीच खलबतं सुरु होती. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी राजस्थानमधील मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराबाबत मोठा खुलासा केला आहे. भाजप कोणत्याच नेत्याला समोर ठेवून विधानसभा निवडणूक लढवणार नाही, असं मोदी म्हणाले.

राजस्थानमध्ये विजय मिळाल्यानंतरच याबाबतचा निर्णय घेण्यात येईल, असं मोदी म्हणाले आहेत. पंतप्रधानांनी सोमवारी चित्तोडगडच्या सभेमध्ये बोलताना याबाबत माहिती दिली आहे. विशेष म्हणजे मोदी याची घोषणा करताना माजी मुख्यमंत्री आणि राजस्थानमधील मुख्यमंत्री पदाच्या प्रबळ दावेदार वसुंधरा राजे या व्यासपीठावरच उपस्थित होत्या.

पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केलं की,कोणताही चेहरा समोर न ठेवता निवडणूक लढवली जाईल. मोदी म्हणाले, 'या निवडणुकीत आपला एकच चेहरा आहे, तो म्हणजे कमळ. या कमळालाच प्रचंड बहुमताने विजयी करा. कमळाच्या नेतृत्वातच आपल्याला पुढे जायचंय आहे आणि राजस्थानमध्ये विजय प्राप्त करायचाय. आपली संकल्प कमळ आहे आणि उमेदवारही कमळ आहे. कमळ उगवणार आणि भाजप जिंकणार.'

राजस्थानमध्ये माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांना मुख्यमंत्री पदासाठी प्रबळ उमेदवार माणलं जात होतं. वसुंधरा राजे आपले नाव घोषित व्हावे यासाठी आग्रही होत्या. पक्ष नेतृत्वावर त्या नाराज असल्याच्याही चर्चा रंगल्या होत्या. पण, सध्या त्यांनी तलवार म्यान केल्याचं सांगितलं जातंय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभेत बोलताना काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. राजस्थान गुन्हेगारीमध्ये अव्वल आहे. महिलांवर आणि दलितांवरील अत्याचारात प्रथम आहे. दंगली सर्वात जास्त राजस्थानमध्ये होतात. काँग्रेसने राज्याला अधोगतीकडे नेले आहे. आमचे सरकार राज्यात आल्यास महिलांच्या संरक्षणाला प्राधान्य दिले जाईल, असं ते म्हणाले. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT