Prime Minister narendra Modi big statement on Israel-Hamas war ESAKAL
देश

Israel Hamas War : रमजानमध्ये संदेशवाहक पाठवून युद्ध थांबले, इस्राईल-हमास युद्धावर पंतप्रधान मोदींचं मोठं वक्तव्य

Israel Hamas War : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी एका मुलाखतीत अनेक विषयांवर भाष्य केले. त्यांनी देशाच्या भविष्यासाठीचे त्यांचे व्हिजनही शेअर केले.

Sandip Kapde

Israel Hamas War: इस्राईल-हमास युद्धाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठा खुलासा केला आहे. रमजानच्या पवित्र महिन्यात भारताने युद्ध थांबवण्याची विनंती केली होती. त्यासाठी भारतातून खास दूत पाठवण्यात आला, जेणेकरून युद्ध थांबवता येईल. इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी भारताची विनंती मान्य केली आणि युद्धबंदीला मान्यता दिली, अशी माहिती नरेंद्र मोदी यांनी दिली.

"...मी माझा विशेष दूत इस्राईलला पाठवला आणि त्याला पंतप्रधान (बेंजामिन नेतन्याहू) यांना किमान रमजानच्या काळात गाझामध्ये बॉम्बस्फोट न करण्याविषयी सांगण्यास व समजावून सांगण्यास सांगितले. त्यांनी (इस्राईल) त्याचे पालन करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. शेवटी, दोन-तीन दिवस भांडण झाले, इथे तुम्ही मुस्लिमांच्या मुद्द्यावरून मला कोंडीत पकडत आहात, पण मी त्याचा प्रचार केला नाही. अन्य काही (देशांनी) देखील प्रयत्न केले, आणि त्यांना देखील परिणाम मिळाले असतील. मी देखील प्रयत्न केला," असे नरेंद्र मोदी यांनी इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

मुलाखतीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या विशेष दूतावीषयी बोलत होते ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल होते. डोवाल यांनी रमजानच्या आधी ११ मार्च रोजी इस्राईलला भेट दिली होती. त्यांनी इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांची भेट घेतली आणि प्रादेशिक विकासावर चर्चा केली. तसेच गाझामधील लोकांच्या गरजांकडे लक्ष देण्यास सांगितले. त्या काळात गाझामध्ये अन्नपदार्थांची तीव्र टंचाई होती. इस्राईलच्या पंतप्रधानांनीही X वर ही माहिती दिली होती.

बैठकीत डोवाल यांनी ओलीसांची सुटका आणि मानवतावादी मदतीबाबत चर्चा केली. ऑक्टोबरमध्ये हमासने इस्राईलवर हल्ला करून 1200 लोकांना ठार केले होते. त्यांनी 250 इस्राईली लोकांनाही ओलीस ठेवले होते. डोवाल यांनी इस्त्राईली समकक्ष तजाखी हानेग्बी यांचीही भेट घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan statement: 'ऑपरेशन सिंदूर'च्या पहिल्याच दिवशी झाला होता भारताचा पराभव - पृथ्वीराज चव्हाणांचं विधान!

IPL 2026 All Teams: ग्रीन सर्वात महागडा खेळाडू, तर अनकॅप्ड खेळाडूंही मलामाल; लिलावानंतर पाहा सर्व संघांतील खेळाडूंची यादी

IPL 2026 Auction Live: जाता जाता Prithvi Shawला दिलासा! एका फ्रँचायझीला आली दया... घेतलं एकदाचं संघात, बघा कोणाकडून खेळणार

PL 2026 Auction : पप्पू यादव यांचा मुलगा आयपीएलमध्ये खेळणार; लिलावात मोजली तगडी रक्कम, जाणून घ्या कोणत्या संघाची झाली कृपा

मोठी बातमी! सिडनीतील दहशतवादी हल्ल्याचं भारतीय कनेक्शन उघड; तेलंगणा पोलिसांनी केली पुष्टी...

SCROLL FOR NEXT