train.
train. 
देश

देशातील पहिली विनाचालक मेट्रो धावली; मोदींच्या हस्ते झाले उद्घाटन

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली - देशातील पहिल्या विनाचालक मेट्रोचे उद्‍घाटन झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील पहिल्या विनाचालक ट्रेनचे आज (28 ता.) उद्घाटन केले. याआधीच या ट्रेनचे उद्‍घाटन होणार होते, पण काही कारणामुळे ते पुढे ढकलले गेले.  मॅजेंटा लाइनवर (जनकपुरी पश्‍चिम- बोटॅनिकल गार्डन) ही मेट्रो धावली.

एन. श्रीधरन यांच्या अथक प्रयत्नांनी साकारलेल्या दिल्ली मेट्रोचे नाव जगभरात झाले आहे. एकूण १० मार्गिकांवर धावणाऱ्या मेट्रोगाड्या दिल्लीच्या वैभवात भर टाकत आहेत. दिल्लीतील ‘डीटीसी’ बससेवा कमालीची बेभरवशाची असल्याचा पूर्वानुभव असल्याने मेट्रोवर अवलंबून राहणाऱ्या प्रवाशांची संख्या लाखोंच्या घरात आहे. कोरोना काळात सुमारे चार महिने बंद असलेली दिल्ली मेट्रो सप्टेंबरपासून पुन्हा सुरू झाली. शेतकरी आंदोलन जोरात सुरू असलेल्या सीमाभागांतून गुडगाव, नोएडा, गाझियाबादकडे जाणारी मेट्रोसेवाही एखादा अपवाद वगळता सुरू आहे. 

दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा २५ डिसेंबर हा वाढदिवस असतो व वाजपेयींच्याच हस्ते २००२ मध्ये याच दिवशी दिल्ली मेट्रोने आपल्या व्यावसायिक कामकाजाला सुरवात केली होती. वाजपेयी व दिल्लीच्या तत्कालीन मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी त्याच दिवशी डीएमआरसी ते शहादरा-तीस हजारी या ८.२ किलोमीटरच्या पहिल्या मेट्रोतून काश्‍मिरी गेट ते तीस हजारी या मार्गावर तिकीट (टोकन) काढून प्रवास केला होता. त्यामुळे भारतातील पहिल्या चालक रहित मेट्रोचेही उद्‍घाटन याच दिवशी व्हावे यासाठी दिल्ली मेट्रोचे जोरदार प्रयत्न सुरू होते. मात्र पीएमओकडून याबाबात लवकर उत्तर मिळाले नाही. अखेर या ट्रेनचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झाले.

चालकरहित मेट्रोची तांत्रिक तयारी पूर्ण झाल्याचे दिल्ली मेट्रो रेल्वे महामंडळाने (डीएमआरसी) स्पष्ट केले . सध्या सुरुवातीचे काही दिवस या गाड्यांमध्ये चालकही असतील पण, त्यांचे काम फक्त मेट्रोच्या प्रवासावर देखरेख ठेवणे इतकेच असेल. एखाद्या प्रवाशाला काही अडचण आली तर, त्यांच्या मदतीसाठी हे चालक सुरुवातीच्या केबिनमध्ये राहतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : ऋतुराजने पुन्हा नाणेफेक गमावली; पंजाबने घेतला गोलंदाजीचा निर्णय

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

South India Travel : उन्हाळ्यातही करू शकता दक्षिण भारताची सफर; जाणून घ्या 'ही' थंड हवेची ठिकाणं

SCROLL FOR NEXT