mann ki baat 
देश

पंतप्रधान मोदींच्या 'मन की बात'मधील महत्त्वाचे मुद्दे

कार्तिक पुजारी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'मन की बात' कार्यक्रमाच्या माध्यमातून देशातील जनतेशी संवाद साधला.

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime minister narendra modi mann ki baat) यांनी आज 'मन की बात' कार्यक्रमाच्या माध्यमातून देशातील जनतेशी संवाद साधला. दर महिन्याच्या शेवटी हा कार्यक्रम घेतला जातो. मोदींची ही 80 वी 'मन की बात' होती. मोदी यांचा ‘मन की बात’ कार्यक्रम प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी प्रसारित होतो. पंतप्रधान मोदी यांनी आपल्या संबोधनाच्या सुरुवातीला मेजर ध्यानचंद यांचा उल्लेख केला. मोदी यांनी ट्विट करत नागरिकांना आजचा ‘मन की बात’ कार्यक्रम एकण्याचं आवाहन केलं होतं. त्यांनी संबोधनात कोणत्या महत्त्वाच्या विषयांना हात घातला हे पाहूया... (National Latest Marathi News)

- देश आज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. आपल्याला हे लक्षात ठेवावं लागले की स्वच्छ भारत अभियानाला आपण कधीही मंद पडू देणार नाही. आपल्या देशात जितके शहर 'वॉटर प्लस सिटी' होतील तितकी स्वच्छता वाढेल. आपल्या नद्या साफ होतील आणि पाणी वाचवण्याच्या जबाबदारीचेही शिक्षण मिळेल. कोरोना काळात स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत आहे

- येत्या काही दिवसांत विश्वकर्मा जयंती येणार आहे. भगवान विश्वकर्माला आपल्याकडे विश्वाच्या उत्पत्तीचे प्रतिक मानले जाते, जो आपल्या शक्तीने वस्तूंची निर्मिती करतो. यात छोट्या-मोठ्या वस्तू, सॉफ्टवेअर, सॅटेलाईट या वस्तूही येतात. ही सर्व विश्वकर्माची उत्पत्ती आहे. आपल्याला कौशल्य असणाऱ्या लोकांचा सन्माना करायला हवा. कौशल्य मिळवण्यासाठी मेहनत घ्यावी लागेल.

- गेल्या काही वर्षांत झालेल्या प्रयत्नामुळे संस्कृतबाबत जागरुकता वाढली आहे. आता आपल्याला या दिशेने अधिक प्रयत्न करावे लागतील. आपला जुना वारसा सांभाळणे आणि तो पुढच्या पीढीपर्यंत देणे हे आपले कर्तव्य आहे. यासाठी सर्वांचे प्रयत्न व्हायला हवेत.

- तरुणांनी वेगवेगळ्या खेळ प्रकारात कौशल्य मिळवायला हवं. गावागावात खेळांच्या स्पर्धा सुरु राहायला हव्यात. मेजर ध्यानचंद यांनी जो मार्ग तयार केला आहे, त्या मार्गावर आपल्याला पुढे जावं लागले. कित्येक वर्षानंतर खेळांबाबत कुटुंब, समाज, राज्य आणि राष्ट्र एकमताने सोबत आल्याचं पाहायला मिळतंय

- आज जगभरातील लोक अध्यात्म आणि दर्शन याबाबत चर्चा करत आहेत. त्यामुळे आपली जबाबदारी आहे की या महान परंपरेला आपण पुढे घेऊन जावं, जे कालबाह्य आहे त्याला सोडून द्यायला हवं, पण जे कालातीत आहे त्याला पुढे घेऊन जायला हवं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT