PM Narendra Modi
PM Narendra Modi esakal
देश

Narendra Modi : ...तर संयुक्‍त राष्ट्रे ठरतील ‘गप्पांची दुकाने’; जी-७ परिषदेच्या समारोपाच्या सत्रात ते बोलत होते

सकाळ वृत्तसेवा

हिरोशिमा - सध्याच्या जगाचे वास्तव रूप संयुक्त राष्ट्र आणि सुरक्षा समितीमध्ये प्रतिबिंबीत झाले नाही, तर या संस्था केवळ ‘गप्पांची दुकाने’ ठरतील, अशा तिखट शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताची भूमिका व्यक्त करत सुधारणा घडवून आणण्याचे जोरदार आवाहन केले. जगभरात शांतता टिकून रहावी यासाठीच संयुक्त राष्ट्रांची स्थापना झाली असताना इतर परिषदांमध्ये याच मुद्द्यावर का चर्चा करावी लागत आहे, असा सवालही मोदी यांनी उपस्थित केला.

जी-७ परिषदेच्या समारोपाच्या सत्रात बोलताना मोदी यांनी संयुक्त राष्ट्रांच्या रचनेत सुधारणा करण्याची भारताची मागणी पुन्हा एकदा जोरकसपणे मांडली. मोदी म्हणाले,‘‘शांतता आणि स्थैर्याबद्दल आपण विविध व्यासपीठांवर का चर्चा करतो, याचे विश्‍लेषण होणे आवश्‍यक आहे. संघर्ष टाळण्याच्या हेतूनेच स्थापन झालेल्या संयुक्त राष्ट्रांना सध्या सुरु असलेले संघर्ष का थांबविता आलेले नाहीत?

दहशतवादाची व्याख्याही या संस्थेला निश्‍चित करता आलेली नाही. सारासार विचार केल्यास या प्रश्‍नांचे उत्तर मिळते. गेल्या शतकात स्थापन झालेली ही संस्था सध्याच्या शतकातील जगाचे प्रतिनिधित्व करत नाही. त्यामुळेच संयुक्त राष्ट्रे आणि सुरक्षा समिती यांच्यात सुधारणा आवश्‍यक आहे. या संस्थांमध्ये दक्षिण जगाचेही प्रतिनिधित्व असावे. अन्यथा, संघर्ष संपविण्याबाबत आपण केवळ गप्पाच मारत राहू, असेही मोदींनी सांगितले. मोदी यांनी हिरोशिमा येथील शांती स्मारकावर जाऊन अणुबाँब हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना आदरांजली वाहिली. मोदी उद्या (ता. २२) ऑस्ट्रेलियाला रवाना होतील.

द्विपक्षीय बैठका

पंतप्रधान मोदी यांनी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि ब्राझीलचे अध्यक्ष इनॅशिओ लुला दा सिल्वा यांच्याबरोबर स्वतंत्रपणे चर्चा केली. सुनक यांच्याबरोबर चर्चा करताना मोदी यांनी भारत आणि ब्रिटन यांच्यादरम्यान झालेल्या व्यापार कराराच्या प्रगतीवर विशेष भर दिला. तसेच, गुंतवणूक आणि विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रांमधील सहकार्य वाढविण्याबाबतही दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. लुला यांच्याबरोबरील बैठकीत संरक्षण उत्पादन, व्यापार आणि अपारंपरिक ऊर्जा या क्षेत्रांमधील सहकार्य दृढ करण्याबाबत चर्चा झाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Accident News: इगतपुरीच्या भावली धरणात ५ जणांचा बुडून मृत्यू; मृतांमध्ये तीन मुली व दोन मुलांचा समावेश

IPL Qualifier 1: मिचेल स्टार्कची 24 कोटी वसूल करणारी कामगिरी! हेडचा त्रिफळा उडवलाच, पण KKR ला दिली स्वप्नवत सुरुवात

Pune Porsche Accident : पोर्शे कार अपघातातील सीसीटीव्ही फुटेज् अन् आरोपींच्या माहितीचा ताळमेळ बसेना, नेमकं काय झालं?

Bacchu Kadu vs Sachin Tendulkar : तर सचिन तेंडुलकरचा पुतळा जाळणार... बॉडीगार्डनं जीवन संपवल्यानंतर बच्चू कडूंनी साधला निशाणा

Silver Price Update : चांदीचे दर गगनाला भिडले! इराण अन् सौदीत टेन्शन वाढल्याने १ लाखाच्या वर जाणार किंमत

SCROLL FOR NEXT