Ram Mandir Postage Stamp eSakal
देश

Ram Mandir Postage Stamp : पंतप्रधान मोदींनी प्रसिद्ध केली श्री राम जन्मभूमी मंदिरावर आधारित टपाल तिकीटे; पाहा व्हिडिओ

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी श्री राम जन्मभूमी मंदिरावर आधारित टपाल तिकीटे प्रसिद्ध केली आहेत.

Sudesh

Ram Janmabhoomi Postage Stamp : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी श्री राम जन्मभूमी मंदिरावर आधारित टपाल तिकीटे प्रसिद्ध केली आहेत. यासोबतच जगभरात श्रीरामावर आधारित टपाल तिकिटांचे कलेक्शन असणाऱ्या एका पुस्तकाचं देखील प्रदर्शन करण्यात आलं.

"आज श्रीराम मंदिर प्राण-प्रतिष्ठा अभियानातील आणखी एका कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी मिळाली. आज श्री राम जन्मभूमी मंदिरावर आधारित सहा टपाल तिकिटे प्रसिद्ध करण्यात आली. तसंच, जगभरात श्रीरामावर आधारित असणाऱ्या सर्व टपाल तिकिटांचा एक अल्बम प्रसिद्ध करण्यात आला आहे. या निमित्ताने मी देशातील सर्व नागरिकांचं आणि जगभरातील राम भक्तांचं अभिनंदन करतो." अशी प्रतिक्रिया पंतप्रधान मोदींनी यावेळी दिली.

कसं आहे टपाल तिकीट?

या टपाल तिकिटावर श्रीराम मंदिर, 'मंगल भवन अमंगल हारी' ही ओळ, सूर्य, शरयू नदी आणि मंदिराच्या आजूबाजूच्या मूर्ती दाखवण्यात आल्या आहेत. इतर तिकिटांमध्ये श्रीराम मंदिर, भगवान गणेश, श्री हनुमान, जटायू, केवटराज आणि माता शबरी यांचा समावेश आहे. या तिकीटाच्या डिझाईनमधून आकाश, हवा, अग्नी, पृथ्वी आणि जल असे पंचमहाभूत दिसत आहेत.

पुस्तकात कोणकोणत्या देशांचा समावेश?

यासोबत आज प्रसिद्ध झालेल्या पुस्तकामध्ये विविध देशांमधील श्रीरामावर आधारित टपाल तिकिटांचा समावेश आहे. 48 पानांच्या या पुस्तकामध्ये अमेरिका, न्यूझीलंड, सिंगापूर, कॅनडा, कंबोडिया, श्रीलंका, फिजी अशा सुमारे 20 देशांचा समावेश आहे. यासोबतच युनायटेड नेशन्सच्या तिकिटाचा देखील यात समावेश करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT