PM Modi 
देश

नव्या शैक्षिणक धोरणावर मोदी काय म्हणाले, वाचा भाषणातील प्रमुख मुद्दे

सकाळ डिजिटल टीम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर भाष्य केले. केंद्रीय शिक्षण विभागाच्या संम्मेलनाची मोदींच्या भाषणाने सुरुवात झाली. तीन-चार वर्षांच्या विचार-मंथनानंतर नव्या शैक्षणिक धोरणाला मंजूरी मिळाली आहे. सर्व विचारधारेची मंडळी यावर चर्चा करत आहेत. सर्व समावेशक धोरणामुळे याला कोणाचाही विरोध नाही, असेही मोदींनी यावेळी सांगितले. नवे शैक्षणिक धोरण प्रत्यक्षात कसे आणायचे याचा आता विचार सुरु झाला आहे. नवे शैक्षणिक धोरण देशाच्या उज्वल भविष्याचा पाया आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. सशक्त आणि आत्मनिर्भर भारतासाठी नवे शैक्षणिक धोरण फायदेशीर ठरेल, असा विश्वासही मोदींनी यावेळी व्यक्त केला. 

नव्या धोरणात सृजनशीलतेची संधी

नर्सरीतील मुले सुद्धा आता तंत्रज्ञानाचे शिक्षण घेताना दिसेल. भविष्यातील तयारीसाठी ही गोष्ट फायद्याची ठरेल. कित्येक वर्षांपासून शैक्षणिक धोरणात बदल झाला नव्हता. त्यामुळे हा बदल अपेक्षित होता. डॉक्टर-इंजिनियर बनण्याची स्पर्धा संपून नव्या युगाला सुरुवात होईल, असे धोरण सत्यात उतरत आहेत. त्यामुळे युवा कल्पकतेला वाव मिळेल, असेही मोदींनी म्हटले आहे.   

मोदींच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

-शिक्षण आणि संशोधनातील दरी कमी होण्यास मदत होईल

-समाजातील तेढ आणि भेदभाव दूर करणारे शैक्षणिक धोरण

-पाचवी पर्यंत मातृभाषेत शिक्षण दिल्याने विद्यार्थ्यांचा  पाया मजबूत होईल.

- एका वेळी अनेक कोर्स करण्याची विद्यार्थ्यांना मूभा देणारे शिक्षण 

-तंत्रज्ञानाला सृजनशीलतेची जोड देण्याचा प्रयत्न नव्या शैक्षणिक धोरणात करण्यात आला आहे

- एका वेळी अनेक कोर्स करण्याची विद्यार्थ्यांना मूभा देणारे शिक्षण 

- या धोरणामुळे मातीशी नाळ कायम ठेवून जागतिक दर्जाचे शिक्षण दिले जाईल

-नव्या शिक्षण धोरणाची अंमलबजावणी सोपी

- विद्यार्थ्यांना जागतिक शिक्षण देण्याचा प्रयत्न

- देशाच्या पायाभरणीसाठी नवे शैक्षणिक धोरण उपयुक्त ठरेल

- देशात शैक्षणिक धोरण बदलाची आवश्यकता होती

- नव्या शैक्षणिक धोरणात कोणताही भेदभाव नाही

- भविष्याचा विचार करुनच नवे धोरण आखण्यात आले आहे

-देशाला आणि देशवासियांना मजबूत करण्याचा यामागे प्रामाणिक हेतू  

-नव्या शैक्षणिक धोरणाला कोणाचाही विरोध नाही

-तीन-चार वर्षांच्या विचार-विनिमयानंतर शैक्षणिक धोरणात बदल झाला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT