Narendra Modi
Narendra Modi 
देश

निवडणूक वर्षात मोदींचे 'चलो गाँव की ओर' 

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विदेश दौरे गेल्या साडेचार वर्षांत प्रचंड चर्चेत राहिले. मात्र, आता निवडणुकीच्या वर्षात मोदींनी विदेशाऐवजी स्वदेश दौऱ्यांना प्राधान्य दिल्याचे दिसते. "चलो गाँव की ओर'चा संकल्प निवडणुकीच्या निमित्ताने घेणारे पंतप्रधान संसद अधिवेशनानंतर देशव्यापी दौऱ्यासाठी निघणार आहेत व नऊ जानेवारीला (बुधवार) ते महाराष्ट्रातील सोलापूरपासून त्याचा प्रारंभ करणार असल्याची माहिती मिळाली. 

मोदींनी 2014 मध्ये सत्ताप्राप्ती झाल्यापासून गेल्या साडेचार वर्षांत किमान 48 दौरे केले. महिन्याची सरासरी काढता दरमहा एक असा याचा हिशेब होतो. साहजिकच मोदींच्या विदेश दौऱ्यांबाबत सडकेपासून संसदेपर्यंत चर्चा सुरू झाली. एका नेत्याने त्यांना, "विदेश दौरे झाले असतील तर (पंतप्रधानपदाचा) अंशकालीन कार्यभार सांभाळा,' असा टोला लगावला होता. या साऱ्या दौऱ्यांचा मोदींनी भाजपचा एनआरआय मतदार टक्का वाढविण्यासाठीही खुबीने वापर करून घेतला होता. मात्र, नवे वर्ष निवडणुकीचा सांगावा घेऊन येणारे आहे.

तीन राज्यांत भाजपला सत्ता गमवावी लागल्यावर सावध झालेल्या भाजप नेतृत्वाने जमिनीवर येऊन ठोस काही तरी दाखवायला हवे, हे मनावर घेतले आहे. साहजिकच मोदींनीही निवडणुकीपर्यंत विदेश दौऱ्यांना अल्पविराम देण्याचे ठरविल्याचे दिसते. कारण, 2019 च्या पहिल्या चार महिन्यांत मोदींचा एकही विदेश दौरा प्रस्तावित नसल्याचे पीएमओच्या माहितीवरून दिसते. निवडणूक जाहीर होईपर्यंत मोदी देशभरात जाहीर सभा घेणार आहेत. त्याचा प्रारंभ सोलापूरपासून होणार आहे. त्यानंतर वाराणसीत 21 जानेवारीला प्रवासी भारतीय दिन कार्यक्रमात मोदी सहभागी होतील. 

पहला वोट मोदी के नाम! 
येत्या 12 जानेवारीला स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या राष्ट्रीय युवादिनी भाजपचे एक खास अभियानाचा प्रारंभ होणार आहे. "पहला वोट मोदी के नाम' असे त्याचे नाव आहे. 2019 मध्ये पहिल्यांदाच मतदार बनणाऱ्या लाखो युवकांनी आयुष्यातील पहिले मत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सशक्त नेतृत्वाला द्यावे, यासाठी भाजप देशपातळीवर ही खास मोहीम चालविणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satwiksairaj Rankireddy Chirag Shetty : सात्विक - चिराग जोडीनं थायलंड ओपनची गाठली फायनल

'मोठं होऊन पंतप्रधान व्हाल', ज्योतिषीने केली होती भविष्यवाणी; प्रियांका गांधींनी सांगितला किस्सा

Priyanka Gandhi: प्रियंका गांधींनी लोकसभा निवडणूक का लढवली नाही? कारण आलं समोर

किर्झिगस्तानमध्ये हिंसाचार! स्थानिक लोकांकडून पाकिस्तानसह भारतीय विद्यार्थ्यांनाही लक्ष्य; परराष्ट्रमंत्र्यांनी घेतली दखल

Latest Marathi News Live Update : मुलुंड घटनेप्रकरणी आरोपींना एक दिवसाची कोठडी

SCROLL FOR NEXT