देश

775 कोटींच्या 'डिफेन्स कॉम्प्लेक्स'चे उद्घाटन करणार PM मोदी

नामदेव कुंभार

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज, गुरुवारी सकाळी राजधानी दिल्लीत संरक्षण मंत्रालयाच्या दोन कार्यालयाचे उद्घाटन करणार आहेत. कस्तुरबा गांधी मार्ग आणि आफ्रिका अव्हेन्यू येथे 'डिफेन्स कॉम्प्लेक्स'ची दोन संकुलं उभारण्यात आली आहेत. यासाठी 775 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला असून ७००० कर्मचारी काम करु शकतील एवढी कार्यालयांची क्षमता आहे. आफ्रिका अव्हेन्यू इथल्या संरक्षण कार्यालय संकुलाला भेट देऊन लष्कर, नौदल, हवाई दल आणि नागरी अधिकाऱ्यांशी पंतप्रधान संवाद साधणार आहेत. त्यानंतर उपस्थिताना ते संबोधित करतील. संरक्षण मंत्री, गृह निर्माण आणि नागरी व्यवहार मंत्री, संरक्षण राज्य मंत्री, गृह निर्माण आणि नागरी व्यवहार राज्यमंत्री, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आणि सशस्त्र दलाचे प्रमुख या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहतील.

संरक्षण मंत्रालयाचे कर्मचारी सध्या काम करत असलेल्या दिल्लीतील साऊथ ब्लॉकमध्ये असललेल्या वेगवेळ्या कार्यालयातील अनेक इमारती जुन्या झाल्या आहेत. संरक्षण मंत्रालयाकडून तयार करण्यात आलेल्या डिफेन्स कॉम्ल्पेक्समध्ये आता हे सर्व कर्मचारी स्थलांतरीत केले जाणार आहेत. दिल्लीतील कस्तूरबा गांधी मार्ग परिसरात ४,५२००० स्क्वेअर फुट क्षेत्रात आणि चाणक्यपुरी परिसरातील आफ्रीका एव्हेन्युमध्ये ५ लाख स्केअर फुट क्षेत्रात हे कार्यालयं तयार केले जात आहे.

नव्या संरक्षण कार्यालय संकुलाविषयी

नव्या संरक्षण कार्यालय संकुलात, संरक्षण मंत्रालय आणि लष्कर, नौदल, हवाई दलासह सशस्त्र दलांचे 7000 अधिकारी काम करतील. ही इमारत आधुनिक, सुरक्षित आणि कार्यात्मक स्थान पुरवणार आहे. इमारतीच्या कार्य व्यवस्थापनासाठी त्याचबरोबर दोन्ही इमारतींच्या संपूर्ण सुरक्षा आणि देखरेखीसाठी एकात्मिक आज्ञा आणि नियंत्रण केंद्र उभारण्यात आले आहे. नवे संरक्षण कार्यालय संकुल उर्जा समृध्द आणि समावेशक सुरक्षा व्यवस्थापन उपायांनी समृध्द आहे. या इमारतीचे वैशिष्ट्य म्हणजे एलजीएसएफ (लाईट गॉज स्टील फ्रेम) म्हणून ओळखले जाणारे नवे आणि शाश्वत बांधकाम तंत्रज्ञान. या तंत्रज्ञानामुळे पारंपारिक आरसीसी बांधकामाच्या तुलनेत बांधकामाचा काळ 24-30 महिन्यांनी कमी होतो. संसाधन समृध्द हरित तंत्रज्ञानाचा वापर इमारतीसाठी करण्यात आला असून पर्यावरण स्नेही पद्धतींना इथे प्रोत्साहन देण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT