G7 summit 
देश

PM मोदींनी स्विकारलं G-7 संमेलनाचं आमंत्रण; ब्रिटनचे PM जॉनसन येणार भारतात

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली :  ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना G-7 शिखर संमेलनासाठी अतिथी म्हणून आमंत्रित केलं आहे. G-7 शिखर संमेलन यावेळी कॉर्नवॉलमध्ये जून महिन्यात आयोजित होणार आहे. 

बोरिस जॉनसन यांनी यावेळी म्हटलंय की, G-7 शिखर संमेलनाच्या आधी ते भारताचा दौरा करणार आहेत. त्यांनी पुढे म्हटलंय की, 'जगासाठी फार्मसी'च्या  (pharmacy of the world) स्वरुपात भारत आधीपासूनच जगातील 50 टक्क्याहून अधिक लशीच्या मागणीचा पुरवठा करतो. ब्रिटन आणि भारताने कोरोना सारख्या महासंकटादरम्यान एकत्र येत मिळून काम केलं आहे. 

यावर्षीच्या भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या समारंभासाठी बोरिस जॉनसन यांना मुख्य अतिथी म्हणून आमंत्रण देण्यात आलं होतं. मात्र, ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन सापडल्यानंतर कोरोनाच्या प्रादुर्भावात अचानकच मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. या साऱ्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर बोरिस जॉनसन यांनी 26 जानेवारी रोजीचा आपला नियोजित दौरा रद्द केला होता.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi Language Rule: कॅब चालकांच्या मराठी भाषा नियमाला आव्हान; सरकारच्या निर्णयानंतर हायकोर्टाने याचिका निकाली काढली

Swine Flu: 'स्वाईन फ्लू'चा कहर! महाराष्ट्रासह दिल्ली, कर्नाटकात रुग्णसंख्येमध्ये मोठी वाढ

Pune Bengaluru Highway : कराडच्या उड्डाणपुलावरील स्ट्रीटलाईटची चाचणी अखेर पूर्ण; रात्रीची वाहतूक सुरु करण्यास 'ग्रीनसिग्नल', वाहनधारकांना मिळणार मोठा दिलासा

Teacher Vidhanparishad Election : पुणे विभाग शिक्षक मतदार संघासाठी टीडीएफ संघटनेकडून कौस्तुभ गावडे यांची अधिकृत उमेदवारी जाहीर

Maharashtra Monsoon Prediction: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनामध्ये फुट?

SCROLL FOR NEXT