narendra modi narendra modi
देश

नरेंद्र मोदी म्हणाले, उत्तराखंडसाठी विधानसभा निवडणूक महत्त्वाची; कारण...

सकाळ डिजिटल टीम

डेहराडून : गुजरातचा मुख्यमंत्री आणि भाजप संघटनेचा कार्यकर्ता असतानाही उत्तराखंडशी जुळून होतो. मी आता दिल्लीत राहतो, पण उत्तराखंडही हृदयात राहतो. उत्तराखंडशी विशेष नाते असल्याचे, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. उत्तराखंडमध्ये विकासासाठी अनेक योजनांना हिरवी झेंडी दाखवण्यात आली आहे. हे दशक उत्तराखंडचे आहे, असेही मोदी (Narendra Modi) म्हणाले.

यंदाची (Uttarakhand) विधानसभा निवडणूक २०२२ खूप महत्त्वाची आहे. कारण, यानंतरच विकास योजनांना पूर्वीपेक्षा अधिक गती मिळेल. उत्तराखंडमधील कुमाऊंमधील नैनितालसह १४ विधानसभा जागांवर ‘विजय संकल्प सभा’ ​​या आभासी निवडणूक रॅलीला संबोधित करताना पंतप्रधान मोदी बोलत होते. विधानसभा निवडणुकीच्या सभेसाठी १० फेब्रुवारी रोजी श्रीनगर, उत्तराखंड येथे येणार आहे, असेही मोदी (Narendra Modi) म्हणाले.

कोरोनाच्या काळात दिल्ली सरकारने परप्रांतीयांना बसमध्ये भरून उत्तराखंडला परत पाठवले होते. ही चिंतेची बाब होती. जनतेवर एवढा मोठा अन्याय केल्यानंतर आता उत्तराखंडमध्ये मत मागायला आल्याचे, नरेंद्र मोदी (Narendra Modi) म्हणाले.

काँग्रेस कधीच विकासाचा विचार करीत नाही. काँग्रेसचे (congress) पहिले काम केवळ एका घराण्याचे, तर दुसरे काम भ्रष्टाचाराचे आहे. काँग्रेसचे तिसरे काम म्हणजे तुष्टीकरणाचे राजकारण करणे, तर चौथे काम प्रकल्प लटकवणे, जेणेकरून त्याचा गैरफायदा घेऊन आपले खिसे भरता येतील, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NCP Candidate: नवनीत राणा, छगन भुजबळ चर्चेत; पण राज्यसभेसाठी राष्ट्रवादीचा वेगळाच मास्टरस्ट्रोक! अखेर नाव जाहीर, कुणाला दिली संधी?

Raigad Traffic: पालीकरांना मोठा दिलासा! शहरात अवजड वाहतुकीला सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय..

World Yogasana Championships: भारताचे निर्विवाद वर्चस्व! तब्बल २२ सुवर्णपदकांसह यजमान संघाचे अव्वल स्थान कायम

Video: Shreyas Iyer ची भारताच्या टी२० संघाचा कर्णधार बनल्यानंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर; म्हणाला, 'ही भावना खूपच...'

अयोध्येतील राममंदिराच्या तिजोरीवर डल्ला, कोट्यवधींची रक्कम गायब; अखिलेश यादवांच्या दाव्याने खळबळ

SCROLL FOR NEXT