देश

PM मोदी आज केदारनाथमध्ये; बाबा भोलेनाथाची करणार पूजा

सकाळ डिजिटल टीम

केदारनाथ: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज केदारनाथ दौऱ्यावर आहेत. केदारनाथमध्ये पंतप्रधान मोदींचा जवळपास चार तासांचा कार्यक्रम आहे. या दरम्यान पंतप्रधान तिथे अनेक विकासकामांचं तसेच योजनांचं लोकार्पण करणार आहेत तसेच भूमीपूजन करणार आहेत. यामध्ये पंतप्रधान मोदी आता आदि गुरु शंकराचार्य यांच्या समाधी स्थळाचं लोकार्पण तसेच त्यांच्या मूर्तीचं अनावरण केलं आहे. 2013 साली आलेल्या मोठ्या प्रलयादरम्यान या समाधीचं नुकसान झालं होतं. पंतप्रधान केदारनाथमध्ये सुरु असलेल्या विकासकामांचा देखील आढावा घेणार आहेत.

केदारनाथच्या या दौऱ्याच्या निमित्ताने मोदी एका महिन्यामध्ये दुसऱ्यांदा उत्तराखंडला गेले आहेत. पंतप्रधान मोदींनी या ठिकाणी बाबा केदारनाथावर रुद्राभिषेक करत भक्तीभावाने पुजा केली. केदारनाथाच्या मंदिरामध्ये पूजा केल्यानंतर ते २५० कोटींच्या केदारपुरी पुनर्विकास योजनांचं उद्घाटन करणार आहेत. मोदी यांच्या हस्ते केदारपुरी पुनर्विकासच्या दुसऱ्या टप्प्यामधील प्रकल्पांचे भूमिपूजन केलं जाणार आहे. या योजना १५० कोटी रुपयांच्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Paper Leak: पेपर फोडला तर १० वर्षे तुरुंगवास! १० कोटींचा दंड अन् मालमत्ताही जप्त होणार; सरकार आणणार कठोर कायदा

Spiritual Education : १९ राज्यांतील १६० स्पर्धकांचा सहभाग; चिन्मय मिशनच्या राष्ट्रीय गीता पठण स्पर्धेत विद्यार्थ्यांनी पटकावली विजेतेपदे

शेजारी नदी, कडाक्याची थंडी, स्वेटरही घालता येत नव्हतं; पूजा बिरारीने सांगितला वाईच्या शूटिंगचा अनुभव, म्हणते- रात्रीच्या अंधारात

Maharashtra Live news : सांगोल्यात वाकी शिवणे गावात दिवसाढवळ्या तलवारी, कोयते आणि काट्यांनी दोन गटांत तुंबळ हाणामारी

Tata Motors: 'टाटा'च्या गाड्या महागणार! 1 डिसेंबरपासून कार, एसयूव्ही आणि ईव्हीच्या किंमतीत होणार वाढ

SCROLL FOR NEXT