new parliament building differences from old structure lok sabha rajya sabha politics sakal
देश

New Parliament Building Inauguration: PM मोदींच्या हस्ते आज होणार नवीन संसद भवनाचं उद्घाटन; जाणून घ्या कार्यक्रमाचे वेळापत्रक

नव्या संसदेच्या उद्घाटनासाठी दिल्लीत कडेकोट बंदोबस्त

अंकिता खाणे (Ankita Khane)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज राजधानी दिल्लीमध्ये नवीन संसद भवनाचे उद्घाटन पार पडणार आहे. या उद्घाटन सोहळ्याला देशभरातील ज्येष्ठ मंत्री, 25 राजकीय पक्षांचे सदस्य आणि धार्मिक नेत्यांसह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत. (Latest Marathi News)

सकाळी हवन व बहुधर्म प्रार्थनेने या कार्यक्रमाला सुरुवात होईल त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी नवीन संसद भवनाचे औपचारिक उद्घाटन करतील. तर दुपारी मुख्य कार्यक्रमाला सुरूवात होईल. उद्घाटन सोहळ्यासाठी मोठी तयारी करण्यात आली आहे.

जुन्या संसदेच्या तुलनेत त्यात अनेक अत्याधुनिक सुविधा बसवण्यात आल्या आहेत.तर नवीन संसद भवनाच्या उद्घाटन समारंभाचे थेट प्रक्षेपण दूरदर्शनवरुन केले जाणार आहे.(Latest Marathi News)

कार्यक्रमाचे वेळापत्रक

पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी 7.15 वाजता विजय चौकात पोहोचणार आहेत.

महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ बांधलेल्या पंडालमध्ये सकाळी 7.30 वाजता पूजा .

सकाळी 8.30 वाजता पूजा समाप्त होणार आहे.

सकाळी 8.30 नंतर पंतप्रधान इतर मान्यवरांसह चेंबरला भेट देणार आहेत.

सकाळी 9 ते 9.30 या वेळेत प्रार्थना सभा होणार आहे.

सकाळी 9.30 नंतर पंतप्रधान प्रार्थना सभेसाठी रवाना होतील.

पाहुण्यांचे आगमन सकाळी 11.30 वाजता सुरू होणार आहे.

दुपारी 12.00 वाजता पंतप्रधान मान्यवरांसह मंचावर पोहोचणार आहेत.

दुपारी 12.07 वाजता राष्ट्रगीत होणार आहे.

दुपारी 12.10 वाजता उपराष्ट्रपतींचे भाषण होणार आहे

दुपारी12.33 वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशासाठी दिलेला संदेश वाचला जाणार आहे.

दुपारी 12.38 वाजता विरोधी पक्षनेते राज्यसभेला संबोधित करणार आहेत.

दुपारी 12.43 वाजता स्पीकर जनतेला संबोधित करतील.

पंतप्रधान मोदी दुपारी 1.05 वाजता 75 रुपयांचे नाणे जारी करतील.

पंतप्रधान मोदींचे भाषण दुपारी 1.10 वाजता सुरू होणार आहे.

नवीन संसद भवनात लोकसभेतील 888 खासदारांसाठी बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तर राज्यसभेत 348 खासदारांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar: मोठी घडामोड! रूपाली चाकणकरांचा राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा; सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

IPL 2026: स्पर्धेआधीच विजेता ठरला! आयपीएल २०२६ ची ट्रॉफी कोण जिंकणार? धुरंधर खेळाडूनं थेट संघाचं नाव सांगितलं, म्हणाला...

Mumbai News : धावत्या जलद लोकलवर दगडफेक; महिला प्रवासी गंभीर जखमी

Pune News : एम्प्रेस गार्डनच्या जागा हस्तांतरणाला विरोध; हरित वारशाच्या रक्षणासाठी जनआंदोलन उभारण्याचे आवाहन

अंदाज चुकला अन्‌ दुचाकीवरील दोघे ट्रकखाली! सोलापुरातील जुना बोरामणी नाका चौकात भीषण अपघात, स्वयंपाकाची ऑर्डर घ्यायला जाताना दोघे ठार, वाचा...

SCROLL FOR NEXT