The Prime Minister should have the courage to openly protest against China 
देश

"पंतप्रधानांनी चीनचा उघड निषेध करण्याची हिंमत दाखवावी"

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली-  सीमेवर घुसखोरी आणि भारतीय भूभागावर कब्जा केलेल्या चीनला कधी माघारी धाडले जाईल, असा सवाल कॉंग्रेसने पुन्हा एकदा केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चीनचा उघड निषेध करावा, असे आव्हानही कॉंग्रेसने दिले आहे. 

कॉंग्रेसचे ज्येष्ठ प्रवक्ते व माजी मंत्री कपिल सिब्बल पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, भारताची एक इंचही जमीन चीनच्या ताब्यात जाता कामा नये. आपल्या भूभागाच्या रक्षणासाठी संपूर्ण देश पंतप्रधानांसोबत उभा आहे. मात्र, सद्यःस्थिती पाहता मुत्सद्देगिरी आणि आर्थिक कारवाई करूनही या प्रकरणात यश मिळण्याबाबत साशंकता असल्याचे सिब्बल यांनी सांगितले. मात्र, हा लष्करी कारवाईसाठी आग्रह आहे काय, या प्रश्नावर सिब्बल यांनी सावध पवित्रा घेतला. ते म्हणाले की, आपले सांगणे म्हणजे लष्करी कारवाईचा संकेत नाही. या मुद्द्यावर त्वरित तोडगा सरकारने काढाला, एवढेच आपले म्हणणे आहे. निर्णय सरकारला करायचा आहे. 

पाकिस्तानच्या पायाखालची वाळू सरकली; लष्कराने हॉस्पिटलना दिले आदेश
सर्वपक्षीय बैठकीतील वक्तव्यावरून कपिल सिब्बल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीवर कडाडून टीकास्त्र सोडले. पंतप्रधानांनी सांगितले होते की, कोणीही आपल्या हद्दीत घुसखोरी केलेली नाही आणि आपल्या सैन्य चौकीवर देखील कोणाचाही कब्जा नाही. परंतु, संरक्षणतज्ज्ञ मात्र उपग्रहांद्वारे घेतलेल्या छायाचित्रांच्या आधारे वेगळीच वस्तुस्थिती असल्याचा दावा करीत आहेत, असेही ते म्हणाले. चिनी सैन्याने गलवान खोऱ्याच्या बऱ्याच भागावर कब्जा केला असून, पहिल्यांदाच असे झाले आहे, की चीनने संपूर्ण गलवान खोऱ्यावर हक्क सांगितला आहे.

सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या वाय जंक्शनवर चीनचा कब्जा आहे. ज्या ठिकाणी भारतीय जवान हुतात्मा झाले, तेथेच चिन्यांनी तंबू उभारला आहे. असे असताना पंतप्रधान मोदी चीनचा उघडपणे निषेध का नाही करीत? भारत भूमीवर कब्जा करणाऱ्यांना मागे रेटल्याशिवाय शांत बसणार नाही, असे पंतप्रधानांनी देशाला सांगावे, असे आव्हानही कपिल सिब्बल यांनी दिले. 

-चिनी घुसखोरी संरक्षणमंत्र्यांनी ३ जूनला मान्य केली 
-१७ जूनला परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार चीनने गलवान खोऱ्यात युद्धसामग्री उभारली. 
-परराष्ट्र मंत्रालयाने २० आणि २५ जून रोजी घुसखोरी झाल्याचे मान्य केले. 
-पंतप्रधान मोदींनी मात्र वस्तुस्थितीच्या उलटे विधान सर्वपक्षीय बैठकीत केले. 
-डेप्सांगमध्ये वाय जंक्शनवर १८ किलोमीटरपर्यंत चीनची घुसखोरी. 
-दौलतबेग ओल्डी धावपट्टीपासून चिनी सैनिक फक्त २५ किलोमीटर दूर 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT