नवी दिल्ली - दिवंगत खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्याप्रकरणी खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी विरोधी पक्षाच्या खासदारांनी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांची भेट घेत चौकशी करण्याची मागणी केली.
नवी दिल्ली - दिवंगत खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्याप्रकरणी खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी विरोधी पक्षाच्या खासदारांनी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांची भेट घेत चौकशी करण्याची मागणी केली. 
देश

डेलकर प्रकरणात पंतप्रधानांनी लक्ष घालावे; विनायक राऊत यांची मागणी

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली - दादरा-नगर हवेली व दमण-दिवचे लोकसभा खासदार  मोहन डेलकर यांच्या आत्महत्या प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष घालावे आणि डेलकरांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या विरोधात कलम ३०४ खाली गुन्हे दाखल करून त्यांच्यावर खटले भरावेत, अशी मागणी शिवसेनेचे गटनेते विनायक राऊत यांनी आज लोकसभेत शून्य काळात केली. त्यांच्या या मागणीला संयुक्त जनता दलाचे सदस्य कौशलेंद्र कुमार यांनी पाठिंबा दिला. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

डेलकर यांनी मुंबईत आत्महत्या केली होती. आत्महत्येच्या संदर्भात त्यांनी गुजराती भाषेत लिहून ठेवलेल्या ११ पानी चिठ्ठीत त्यांनी ते प्रतिनिधित्व करीत असलेल्या केंद्रशासित प्रदेशाचे(दादरा नगर हवेली) वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी त्यांचा छळ करीत असल्याचे नमूद करण्यात आल्याचे उपलब्ध माहितीवरून समजले आहे. त्यांनी यासंदर्भात अनेक अधिकाऱ्यांची नावेही लिहिलेली आहेत. या अधिकाऱ्यांच्या छळाला कंटाळूनच आपण आत्महत्येस प्रवृत्त झाल्याचे त्यांनी लिहिले असल्याचे समजते. आपल्या मतदारसंघात आत्महत्या केली असती तर ते प्रकरणही या अधिकाऱ्यांनी दाबून टाकले असते व म्हणून आपण मुंबईत येऊन आत्महत्या करीत असल्याचेही डेलकर यांच्या चिठ्ठीत लिहिल्याचे समजते. या प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेऊनच महाराष्ट्र सरकारने विशेष तपासदलातर्फे चौकशी सुरु केल्याचे राऊत यांनी सांगितले.

उच्चस्तरीय कारवाई करावी: कौशलेंद्रकुमार
राऊत यांना इतर पक्षांच्या सदस्यांनीही पाठिंबा दिला. संयुक्त जनता दलाचे सदस्य कौशलेंद्रकुमार यांनी यासंदर्भात बोलताना, डेलकर यांच्या लोकसभेतील प्रदीर्घ कारकिर्दीचा उल्लेख करतानाच त्यांच्या अंत्यसंस्काराला आपण उपस्थित होतो आणि डेलकर यांच्याबद्दल तेथील लोकांमध्ये असलेली आपुलकीची भावना जमलेल्या प्रचंड गर्दीवरुन लक्षात येत होती. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन उच्चस्तरीय कारवाई केली जाऊन गुन्हेगारांना शासन केले जावे अशी  मागणी त्यांनी केली.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushma Andhare: सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, कारण अस्पष्ट

Sangli Lok Sabha : सांगलीच्या जागेबाबत शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, याची चर्चा न होता थेट टीव्हीवरच..

Trucks Carrying Cash: चार ट्रक, हजारो कोटींच्या मळलेल्या नोटा अन् पोलीस; वाचा चित्रपटालाही लाजवेल असे थरारनाट्य

Share Market Opening: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजाराची जोरदार सुरुवात; निफ्टी नवीन विक्रमी उच्चांकावर

Latest Marathi News Live Update : सांगलीत भाजपचे दोन उमेदवार आमच्यासमोर- संजय राऊत

SCROLL FOR NEXT