RBI Announcement on 2000 Bank note 
देश

RBI Announcement : 2,000 च्या नोटा चलनातून मागे घेतल्या! RBI ची मोठी घोषणा

RBI News Today: २ हजारच्या नोटा चलनातून काढून घेतल्या आहेत. आरबीआयने आज याबाबत महत्वाची माहिती दिली.

Sandip Kapde

RBI News Today: रिझर्व बँकेने मोठी घोषणा केली आहे. दोन हजार रुपयांच्या बहुचर्चित नोटा चलनातून काढून घेण्याचा निर्णय आरबीआयने घेतला.  आरबीआयने आज याबाबत महत्वाची माहिती दिली.

निश्चिलिकरण नोव्हेंबर २०१६ मध्ये पाहायला मिळाले होते. त्यावेळी २ हजारच्या नोटा चलनात आल्या होत्या. २ हजारची नोट बदलायची असेल तर २३ मे पासून बदलू शकता , असे देखील आरबीआयने स्पष्ट केले. ३० सप्टेंबर पर्यंत नोटा बदलून घेण्याची मुदत राहणार आहे.

“भारतीय रिझर्व्ह बँकेच्या “स्वच्छ नोट धोरण” च्या अनुषंगाने २००० मूल्याच्या नोटा चलनातून काढून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २००० च्या नोटा कायदेशीर चलनात राहतील. सर्व बँकांनी ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत २००० च्या नोटांसाठी ठेव आणि/किंवा विनिमय सुविधा उपलब्ध करून द्यावी," असे आरबीआयने म्हटले आहे.

८ नोव्हेंबर २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १००० आणि ५०० ​​रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून कमी करण्याची घोषणा केली होती. डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देणे आणि काळ्या पैशाचा प्रवाह थांबवणे हे त्याचे प्रमुख उद्दिष्ट होते. यानंतर २००० आणि ५०० च्या नवीन नोटा चलनात आणल्या होत्या.

आरबीआयच्या म्हणण्यानुसार, २३ मे २०२३ पासून, एका वेळी जास्तीत जास्त २०,००० रुपयांच्या नोटा बदलल्या जातील. बँकेच्या इतर कामांवर परिणाम होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे आरबीआयने म्हटले आहे.

मार्च २०१७ पूर्वी जारी करण्यात आलेल्या २,००० रुपयांच्या नोटांपैकी ८९ टक्क्यांहून अधिक नोटांचे आयुष्य चार ते पाच वर्षे पूर्ण झाले आहे. ३१ मार्च २०१८ पर्यंत ६.७३ लाख कोटी रुपयांच्या २,००० रुपयांच्या नोटा चलनात होत्या. ३१ मे २०२३ पर्यंत ३.६२ लाख कोटी रुपयांच्या फक्त दोन हजार रुपयांच्या नोटा चलनात आहेत, जे एकूण नोटांच्या चलनाच्या केवळ १०.८ टक्के आहे, असे आरबीआयने स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar: अखेर वेळ ठरली! नितीश कुमार राजीनामा देणार; तारीख आली समोर, बिहारमध्ये २० वर्षांनंतर बदलाची चाहूल

IPL 2020 Point Table : विदर्भच्या पोट्ट्याने राजस्थानची 'वाट' लावली! Praful Hingeने इतिहास घडवताना हैदराबादला मिळवून दिला दणदणीत विजय, गुणतालिकेत बदल

Pune Accident: पुण्यात थरारक घटना! मद्यपी चालकाने तरुणाला फरफटत नेऊन चिरडले; हडपसर-सासवड रस्त्यावरील घटना, चालकाला अटक!

Mohol Crime: छळातून दुर्दैवी अंत; मोहोळमध्ये नवविवाहितेचा खून, नवरा व सासूला चार दिवसांची कोठडी!

तापमान ४२ अंशावर! ‘ही’ फळे खावा, नैसर्गिक पेये, आंबिल प्या; लहान मुलांची 'अशी' घ्या काळजी, वाचा...

SCROLL FOR NEXT