शरद पवार 
देश

'शरद पवार भाजपाविरोधी आघाडी करत असतील तर...'

नामदेव कुंभार

महाराष्ट्रातील राजकीय हलचाली आणि दिल्लीतील शरद पवारांनी बोलवलेली सर्वपक्षीय बैठक चर्चेत असतानाच NDTV चे संपादक राजदीप सरदेसाई यांनी पृथ्वीराज चव्हाण यांची मुलाखत घेतली आहे. राज्यातील काँग्रेसचा स्वबळचा नारा, शिवसेना आणि शरद पवारांचा राष्ट्रीय मंच याबद्दल प्रश्न विचारण्यात आले. या सर्व प्रश्नांची पृथ्वीराज चव्हाण यांनी उत्तरे दिली आहेत.

प्रश्न : महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार धोक्यात आलं आहे का?

नाही, भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारची स्थापना झाली होती. महाविकास आघाडीमधील प्रत्येक पक्षाचा उद्देश सारखाच आहे. काही जिल्ह्यात काँग्रेस पक्ष कमकुवत आहे. या जिल्ह्यात पक्ष बांधणी सुरु आहे.

प्रश्नः पुढील मुख्यमंत्री काँग्रेसचा असावा, असं तुम्ही म्हणालात त्याबद्दल काय सांगाल?

महाराष्ट्रात काँग्रेस सध्या चौथ्या क्रमांकाचा पक्ष आहे. पहिल्या क्रमांकाचा पक्ष व्हायची इच्छा असेल तर त्यात काय चुकीचं आहे? जर आमच्या आमदारांची संख्या जास्त असेल तर आमचा मुख्यमंत्री होईल. आतापर्यंत हीच पद्धत राहिली आहे.

प्रश्न : तुमच्यामध्ये आणि शिवसेनेमध्ये वैचारिक मतभेत आहेत, हे खरं आहे का?

याकडे तुम्ही हवं तसं पाहू शकता. पण राज्यातील महाविकास आघाडी सरकार एका विशिष्ट उद्देशानं तयार करण्यात आलं आहे. आम्ही शिवसेनेची विचारसरणी सहन करु शकतो. पण भाजपची नाही.

प्रश्न : शरद पवार देशपातळीवर भाजपविरोधीत आघाडी तयार करत आहेत. यामध्ये काँग्रेसची भूमिका आहे का?

शरद पवार भाजपाविरोधात आघाडी तयार करत असतील तर ते स्वागतार्हच आहे. दिल्लीतील निवासस्थानावर त्यांनी काही नेत्यांची बैठक बोलावली आहे. ते स्वागतार्ह आहे. अशा सर्व पक्षांनी एकत्र आलं पाहिजे. आम्हाला त्याची चिंता का असावी?”.

प्रश्न : शिवसेनेपासून राहुल गांधी सावध भूमिका घेतात का?

नाही, असं काही नाही. कारण महाराष्ट्रातील युतीची स्थापना दिल्लीत झाली होती. शिवसेनेच्या पार्श्वभूमीमुळे थोडीशी भीती होती, पण आम्ही राष्ट्रीय नेतृत्वाला पटवून दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News: आमदार अमोल मिटकरीची विमान अपघातप्रकरणी चौकशीची मागणी; मुख्यमंत्री फडणवीसांचे सकारात्मक आश्वासन!

नवाजुद्दीन सिद्दीकीने राजपाल यादवला धोका दिला? मैत्रीत गद्दारी केल्याचा आरोप करत नेटकऱ्यांनी केल ट्रोल

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर परिक्षेत्रातील ८५ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

Nanded News : नांदेडच्या महापौरपदी कविता मुळे; उपमहापौरपदी दीपकसिंह रावत यांची निवड

Mumbai -Kolhapur Train News : मुंबई -कोल्हापूर दरम्यान ६ विशेष गाड्या धावणार; रेल्वे प्रशासनाचा निर्णय

SCROLL FOR NEXT