Railway Board Chairman Information 
देश

खासगी कंपन्यांना भाडे ठरवता येणार; रेल्वे मंडळाच्या अध्यक्षांची माहिती

वृत्तसंस्था

नवी दिल्ली -देशभरात रेल्वेतील खासगी गुंतवणूक वाढविण्यासाठी केंद्र सरकारने आता कंपन्यांना आर्थिक प्रलोभने दाखवायला सुरवात केली आहे. या खासगी चालक कंपन्यांना भविष्यामध्ये भाडे आकारण्याची परवानगी देण्यात येईल, असे रेल्वे मंडळाचे अध्यक्ष व्ही. के. यादव यांनी सांगितले. ज्या मार्गावर या रेल्वे गाड्या धावणार आहेत त्याच मार्गावर वातानुकूलित बस गाड्या आणि विमाने यांची सुविधा देखील आहे, हे त्यांनी भाडे आकारण्यापूर्वी लक्षात ठेवावे असे यादव यांनी नमूद केले. 

भारतामध्ये राजकीयदृष्ट्या रेल्वे हे माध्यम खूप संवेदनशील आहे, आजमितीस ऑस्ट्रेलियाची लोकसंख्या जेवढी आहे तेवढी मंडळी रोज आपल्याकडे गाड्यांमधून प्रवास करत असतात. गरीब जनतेसाठी हे वाहतुकीचे महत्त्वाचे माध्यम आहे. आतापर्यंत केवळ नोकरशहांचे दुर्लक्ष आणि अपुरे मनुष्यबळ यामुळे रेल्वेच्या नेटवर्कचा पुरेपूर वापर होऊ शकला नाही अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. 

म्हणून खासगीकरण 
कोरोनामुळे रेल्वेच्या अर्थकारणाला मोठा तडाखा बसला असून मागील चार दशकांमध्ये प्रथमच ही यंत्रणा एवढ्या मोठ्या प्रमाणावर कोंडीत सापडली आहे. रेल्वेला आर्थिक बूस्टर देण्यासाठी केंद्र सरकारने हे क्षेत्र खासगी उद्योगांसाठी खुले करण्याचा निर्णय घेतला आहे. आलस्टम एसए, बॉम्बर्डायर, जीएमआर इन्फ्रास्ट्रक्चर आणि अदानी एंटरप्रायजेस या बड्या कंपन्यांनी गुंतवणूक करण्याची तयारी दर्शविली आहे. 

जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मोठी गुंतवणूक येणार 
खासगी कंपन्यांच्या माध्यमातून उभारल्या जाणाऱ्या प्रकल्पांमुळे येत्या पाच वर्षांमध्ये या क्षेत्रात ७.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक होणार आहे. देशातील पॅसेंजर रेल्वेगाड्यांचा वेग वाढविण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे. जुलैपर्यंत देशातील १५१ मार्गांवर खासगी कंपन्यांच्या माध्यमातून गाड्या चालविण्याचा सरकारचा विचार असून त्यासाठी कंपन्यांकडून प्रस्ताव देखील मागविण्यात आले आहेत. 

देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : अन्याय, भ्रष्टाचारावर शांत बसत असाल तर…, तुकाराम मुंढेंच्या पोस्टने लक्ष वेधलं

Ganeshotsav Rain Forecast : गुड न्यूज! महाराष्ट्रात पुन्हा पावसाला पोषक हवामान; गणेशोत्सव काळात जोरदार पावसाचा अंदाज

Maharashtra Cabinet: दिलीप वळसे-पाटलांच्या विरोधानंतर मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; डिंभे-माणिकडोह जोडबोगद्याला अखेर स्थगिती

Maharashtra Monsoon: शेतकऱ्यांची चिंता वाढली! राज्यातील ८३ तालुक्यांत २० दिवसांहून अधिक पाऊस गायब; खरीप पिके करपण्याच्या मार्गावर

Amruta Fadnavis: गरबा सर्वसमावेशक उत्सव; मुस्लिमांच्या प्रवेशाला विरोध का? अमृता फडणवीस यांची भूमिका

SCROLL FOR NEXT