देश

चिदंबरम यांची पाठराखण करण्यासाठी सरसावले राहुल-प्रियांका

सकाळ न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कारवाईमुळे अडचणीत आलेले कॉंग्रेस नेते तथा माजी गृहमंत्री पी. चिदंबरम यांची पाठराखण करण्यासाठी माजी अध्यक्ष राहुल गांधी, सरचिटणीस प्रियांका गांधी सरसावले आहेत. सरकारने चिदंबरम यांचे चारित्र्यहनन चालविल्याचा आरोप या नेत्यांनी केला आहे. 

आयएनएक्‍स मीडिया भ्रष्टाचार प्रकरणात "ईडी' आणि सीबीआयने चिदंबरम यांच्या अटकेसाठी चालविलेले प्रयत्न थांबविण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने नाकारले आहे. काळा पैसा पांढरा करण्याचे उत्कृष्ट उदहारण म्हणजे आयएनएक्‍स मीडिया प्रकरण असल्याची टिप्पणीही न्यायालयाने केली आहे. यासोबतच, दोन्ही तपास यंत्रणांनी चिदंबरम यांच्याविरुद्ध "लुकआउट' नोटीस बजावून भारताबाहेर जाण्याचे मार्ग रोखले आहेत. यामुळे चिदंबरम बेपत्ता असल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये झळकल्यानंतर कॉंग्रेसमध्येही अस्वस्थता असून, संपूर्ण पक्ष चिदंबरम यांच्या मदतीसाठी पुढे आला आहे. 

राहुल गांधींनी ट्‌विट करून सरकार, तपास यंत्रणा तसेच प्रसारमाध्यमांनाही लक्ष्य केले. "ईडी', सीबीआय यासारख्या तपास यंत्रणा आणि काही कणाहीन प्रसारमाध्यमांच्या मदतीने सरकारने चिदंबरम यांचे चारित्र्यहनन चालविले आहे. सत्तेच्या या संतापजनक गैरवापराचा मी तीव्र निषेध करतो, असे राहुल यांनी म्हटले आहे. चिदंबरम यांनी सरकारचे अपयश उघड केल्यामुळेच त्यांना लक्ष्य केले जात असल्याचा दावा प्रियांका गांधी यांनी केला आहे. 

चिदंबरम यांची न्यायालयात बाजू मांडणारे विधिज्ञ अभिषेक सिंघवी यांनीही ट्‌विट करून बाजू मांडली. चिदंबरम यांच्यासारख्या प्रतिष्ठित राजकीय नेतृत्वाचे चारित्र्यहनन करण्यासाठी या प्रकरणाला सनसनाटी बनविण्याचा प्रयत्न भयंकर आहे. वैधानिक परिषदेमध्ये काल सायंकाळी साडेसहापर्यंत सहभागी असताना ते फरार कसे असू शकतात, असा प्रश्‍न सिंघवी यांनी केला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

SCROLL FOR NEXT