Robert Vadra and Priyanka gandhi 
देश

Robert Vadra : प्रियांका गांधी सर्वगुणसंपन्न, त्यांनी लोकसभेत असायला हवं; पती रॉबर्ट वाड्रा आग्रही

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचे जावई आणि उद्योगपती रॉबर्ट वाड्रा यांनी त्यांची पत्नी प्रियंका गांधी यांच्याकडे खासदार होण्यासाठी सर्व पात्रता असल्याचे सांगत त्यांचे कौतुक केले आहे. तसेच प्रियंका गांधी यांनी संसदेत असायला हवं, त्या उत्तम काम करतील, असेही वाड्रा म्हणाले.

वाड्रा पुढे म्हणाले, 'प्रियांका संसदेत गेल्या तर मला आनंद होईल. मला आशा आहे की काँग्रेस पक्ष त्यांचा विचार करेल, आणि त्यांच्यासाठी चांगली योजना तयार करेल.

वाड्रा यांच्या या वक्तव्यावरून अनेक अर्थ काढले जात आहेत. दुसरीकडे काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी 2024 ची पुढील लोकसभा निवडणूक लढवू शकतात, असे बोलले जात आहे. प्रियांका गांधींनी हिमाचल प्रदेश आणि कर्नाटकमध्ये निवडणूक प्रचाराचे नेतृत्व केले आहे. दोन्ही राज्यांमध्ये काँग्रेसचा विजय झाला. प्रियंका गांधी लवकरच मोठ्या भूमिकेत दिसणार असल्याचे मानले जात आहे. यापूर्वी त्यांना यूपीचे प्रभारी बनवण्यात आले होते. मात्र, तिथल्या पराभवानंतर त्यांच्याकडे हिमाचल आणि कर्नाटकची जबाबदारी सोपविण्यात आली होती.

सूत्रांनुसार प्रियंका यांची सरचिटणीस किंवा कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्याच्या शक्यतेसह अनेक पर्यायांचा विचार केला जात आहे. तथापि, प्रियांका गांधी या आधीपासूनच तेलंगणा आणि मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसच्या प्रचाराचे नेतृत्व करत आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या प्रभारी सरचिटणीस म्हणूनही त्यांच्यासाठी नवी भूमिका निश्चित करण्यात येऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

SCROLL FOR NEXT