Golden Temple 
देश

Pro-Khalistan slogans: सुवर्ण मंदिरात खलिस्तान समर्थनात घोषणा; भिंडरावालेचे पोस्टर झळकले, ऑपरेशन ब्लू-स्टारला 40 वर्षे

Golden Temple on Operation Blue Star anniversary: लोकांनी विभाजनवादी नेता जरनैल सिंग भिंडरावाले याचे पोस्टर देखील हाती घेतल्याचं सांगण्यात येतंय.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- ऑपरेशन ब्लुस्टारला आज ४० वर्ष होत आहेत. या पार्श्वभूमीवर पंजाबच्या अमृतसरमधील सुवर्ण मंदिरात काही शीख समूहायाच्या लोकांनी खलिस्तान समर्थनात घोषणा दिल्याची माहिती आहे. याशिवाय लोकांनी विभाजनवादी नेता जरनैल सिंग भिंडरावाले याचे पोस्टर देखील हाती घेतल्याचं सांगण्यात येतंय. एएनआयने यासंदर्भातील माहिती दिली आहे.

शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सिमरजित सिंग मान यांनी देखील खलिस्तान समर्थनाथ घोषणा दिल्याचे आणि भिंडरावालेचे पोस्टर हातात घेतल्याचं दिसलं. सुवर्ण मंदिरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. ब्लू-स्टार ऑपरेशनला ४० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त शीख समूदायातील अनेक नेते सुवर्ण मंदिरात आले होते.

पोलीस अधिकारी एसएस रंधवा सिंग यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितलं की, सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. सैन्य तैनात करण्यात आलं असून बॅरिकेट लावण्यात आले आहेत. काही विपरीत घडू नये यासाठी काळजी घेतली जात आहे.

भिंडरावाले हा शीख समूदायाच्या कट्टर संघटनेचा प्रमुख होता. सुवर्ण मंदिरामध्ये भिंडरावाले आणि त्याचे समर्थक लपून बसले होते. त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आदेशाने १९८४ मध्ये ऑपरेशन ब्लू-स्टार राबवण्यात आले होते. यात भारतीय लष्कराने सुवर्ण मंदिरात घुसून भिंडरावाले आणि त्याच्या समर्थकांचा खात्मा केला होता. या सर्व घटनेमुळे पंजाबमध्ये संतापाची लाट पसरली होती.

भिंडरावाले याने मोठ्या प्रमाणात सुवर्ण मंदिरात शस्त्र गोळा केले होते. या ऑपरेशननंतर सरकारला मोठ्या रोषाला सामोरे जावे लागले. शिवाय, इंदिरा गांधी यांना त्यांच्याच दोन शीख सुरक्षारक्षकांनी गोळ्या घालून संपवलं होतं. ३१ ऑक्टोबर १९८४ मध्ये इंदिरा गांधी यांच्या निवासस्थानी ही घटना घडली होती. त्यानंतर देशभरात दंगली देखील उसळल्या होत्या

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये इंदिरा गांधींना गोळ्या घातलेल्या एका सुरक्षा रक्षकाच्या मुलाने फरीदकोट येथून निवडणूक लढवली होती. सरबजित सिंग खालसा यांचा ७०.०५३ मतांनी विजय झाला आहे. त्यांनी आम आदमी पक्षाचे करमजित सिंग अनमोल यांचा पराभव केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT