Robert Vadra and Priyanka gandhi Esakal
देश

Robert Vadra: लंडनमधील संपत्ती खरेदी प्रकरण रॉबर्ट वाड्रा यांना गोत्यात आणणार? ईडीने केली अटकेची तयारी

लंडनमधील संपत्ती खरेदी प्रकरणात रॉबर्ट वाड्रा यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

अंकिता खाणे (Ankita Khane)

लंडनमधील संपत्ती खरेदी प्रकरणात काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वाड्रा यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. सध्या जामीनावर असलेले रॉबर्ट वाड्रा हे आहेत. तर रॉबर्ट वाड्रा यांनी जामीन अर्जाच्या नियमांचा भंग केल्याचा आरोप ईडीने केला आहे. आता या प्रकरणात रॉबर्ट वाड्रा यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

ईडीने काल (बुधवारी) माजी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वाड्रा यांना मनी लाँड्रिंग प्रकरणी जामीन अर्जाच्या नियमांचा भंग केल्याचा दावा करत मंजूर केलेल्या अटकपूर्व जामिनाला आव्हान दिले आहे.

दरम्यान, ईडीच्या वकिलांनी सांगितले की, रॉबर्ट वाड्रा यांनी जामीन अटींचे उल्लंघन केले आहे. ते सिद्ध करण्यासाठी अतिरिक्त प्रतिज्ञापत्र दाखल करणार आहोत. ते न्यायालयासमोर ठेवण्यासाठी त्यांनी थोडा वेळ मागितला असून न्यायमूर्ती सुधीर कुमार जैन यांनी अतिरिक्त प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी ईडीला दोन आठवड्यांची मुदत दिली आहे. पुढील सुनावणी सप्टेंबरमध्ये ठेवण्यात आली आहे.

तर ईडीने याआधी उच्च न्यायालयात रॉबर्ट वाड्रा यांच्या कोठडीची मागणी केलेली होती. संबधित प्रकरणातील पैशांचे व्यवहार हे थेट त्याच्याशी संबंधित असल्याचा आरोपही ईडीने केलेला होता. त्यामुळे त्यांच्या चौकशीसाठी कोठडी देण्याची मागणी करण्यात आली होती. तसेच रॉबर्ट वाड्रा तपासात सहकार्य करत नसल्याचाही दावा ईडीने केला होता.

तर रॉबर्ट वाड्रा यांच्या वकिलाने ईडीचे आरोप फेटाळून लावले होते. तसेच आपल्या अशिलाने तपासात सहकार्य केले आहे आणि समन्स पाठवले गेले तेव्हा ते तपास संस्थेसमोर हजर झाले आहेत असंही ते म्हणाले होते.

काय आहे प्रकरण?

रॉबर्ट वाड्रा यांच्यावर लंडनमधील 12, ब्रायनस्टन स्क्वेअर येथे अंदाजे 1.9 दशलक्ष पौंड (17 कोटींहून अधिक) मालमत्ता खरेदीत मनी लाँड्रिंगचा आरोप करण्यात आलेला आहे. या प्रकरणाची प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग अॅक्ट (PMLA) अंतर्गत चौकशी केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"अपमान सहन करून ते कॉरिडॉरमध्ये बसून राहायचे" रंजनाच्या अपघातानंतर अशोक मामांच्या अवस्थेबद्दल खुलासा

Pune Fraud News : शेअर बाजारात चांगल्या परताव्याच्या आमिषाने ज्येष्ठाची दीड कोटींची फसवणूक

Rain-Maharashtra Latest Live News Update: शेतात विजेच्या धक्क्यामुळे एकाच कुटूंबातील पाचजण ठार

Online Gaming Bill 2025 : लोकसभेत 'ऑनलाइन गेमिंग विधेयक-२०२५' मंजूर!

Tirupati Balaji Temple : अशीही बालाजी भक्ती! तिरुपती मंदिरात भाविकाने दान केलं तब्बल १२१ किलो सोनं; किंमत ऐकून थक्क व्हाल....

SCROLL FOR NEXT