Odisha Train Accident 
देश

Odisha Train Accident : रेल्वे अपघातात प्राथमिक चौकशीत धक्कादायक खुलासा; CBI कडे मोठी जबाबदारी

सीबीआयचे पथक घटनास्थळी दाखल

धनश्री ओतारी

ओडिशामधील बालासोर येथील तीन ट्रेनचा अपघात घातपात तर नव्हता ना असा संशय व्यक्त केला जात आहे. कारण ट्रॅकच्या इंटरलॉकिंग सिस्टीममध्ये जाणीवपूर्वक छेडछाड केल्याचे पुरावे रेल्वेला प्राथमिक तपासात मिळाले आहेत. त्यामुळे आता या अपघाताची सीबीआयमार्फत चौकशी करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. दरम्यान, सीबीआयचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. (Probe suggests deliberate interference in signalling system CBI takes over Odisha train accident investigation)

सीबीआयचे पथक बालासोर येथील अपघातस्थळी पोहोचले आहे. चौकशी केली जात आहे," असे पूर्व मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक रिंकेश रॉय यांनी सांगितले.

दरम्यान रेल्वे अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, रेल्वेची इंटरलॉकिंग सिस्टीम अत्यंत सुरक्षित असून त्यात त्रुटी राहण्यास फारसा वाव नसतो. प्राथमिक तपासात असं समोर आलं आहे की, इंटरलॉकिंग सिस्टीममध्ये जाणीवपूर्वक छेडछाड केल्याशिवाय बदलता येत नाही.(Latest Marathi News)

अधिकाऱ्याने दिलेल्या माहतीनंतर,  बालासोर दुर्घटना हा अपघात नसून कट आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

इंटरलॉकिंग सिस्टममध्ये मानवी हस्तक्षेपामागील हेतू शोधण्यासाठी सीबीआयद्वारे चौकशी केली जात असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले आहे. (Latest Marathi News)

कटक (Cuttack) येथील सरकारी रेल्वे पोलिसांनी (GRP) रेल्वे कायद्याच्या कलम १५३, १५४ आणि १७५ अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे. बालासोर जीआरपीएसचे एसआय पापू कुमार नाईक यांच्या तक्रारीनंतर एफआयआर नोंदवण्यात आला.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI statement on India vs Pakistan match: मोठी बातमी! भारत-पाकिस्तान मॅचबद्दल अखेर 'BCCI'ने स्पष्ट केली भूमिका

Sanjay Raut : आरक्षणावरून राज्यात अराजक; मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी

PM Modi AI video: पंतप्रधान मोदी अन् त्यांच्या आईंचा 'AI' व्हिडिओ प्रकरणी, आता काँग्रेस 'IT' सेलच्या नेत्यांविरुद्ध 'FIR' दाखल!

Umarga News : आरक्षण मिळावे या मागणीसाठी बंजारा समाजातील तरुणाने संपविले जीवन

Heavy Rain : शेलगाव (ज.) मध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने धुमाकूळ; लोकांच्या घरात शिरले पाणी

SCROLL FOR NEXT