देश

"पीएम केअर्स' फंडातून 3,000 व्हेंटिलेटर्सची निर्मिती 

वृत्तसंस्था

नवी दिल्ली - "पीएम केअर्स' फंडातून भारतीय बनावटीच्या 50 हजार व्हेंटिलेटर्सना मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी 3,000 व्हेंटिलेटर्स तयार झाले असून, 1300 व्हेंटिलेटर्स विविध राज्यांना कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी पाठविण्यात आले आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली कोरोनाशी लढा देण्याकरिता पीएम केअर्स फंडाची स्थापना करण्यात आली. त्याअंतर्गत 3,100 कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. त्यापैकी दोन हजार कोटी रुपयांना "मेड इन इंडिया' व्हेंटिलेटर तयार करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. त्यातून 50 हजार व्हेंटिलेटर्स तयार करण्यात येणार आहेत. आत्तापर्यंत 2,923 व्हेंटिलेटर्सची निर्मिती करण्यात आली आहे. जून महिन्याच्या शेवटी आणखी 14 हजार व्हेंटिलेटर्स विविध राज्यांना देण्यात येणार आहेत.

भारत इलेक्‍ट्रॉनिक्‍सकडून 30 हजार, "अगवा हेल्थकेअर'कडून 10 हजार, "एएमटीझेड बेसिक्‍स'कडून 5650, "एएमटीझेड हाय एंड'कडून 4000 आणि "अलाइड मेडिकल'कडून 350 व्हेंटिलेटर तयार केले जाणार आहेत. दरम्यान, स्थलांतरित मजुरांच्या कल्याणासाठी एक हजार कोटी रुपये देण्यात आले आहेत. त्यापैकी महाराष्ट्र (181 कोटी), उत्तर प्रदेश (103 कोटी), तमिळनाडू (83 कोटी), गुजरात (66 कोटी), दिल्ली (55 कोटी), पश्‍चिम बंगाल (53 कोटी), बिहार (51 कोटी), मध्य प्रदेश (50 कोटी), राजस्थान (50 कोटी), कर्नाटक (34 कोटी) यांना ही मदत देण्यात आली आहे. पीएम केअर्स फंडाची स्थापना 27 मार्च रोजी झाली होती. संरक्षणमंत्री, गृहमंत्री आणि अर्थमंत्रीही या फंडाचे सदस्य आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Politics : आराखडा ठरला, आता प्रतीक्षा आरक्षणाची; नेत्यांकडून जोडण्या लावण्याचे काम सुरू

Tamil Nadu News: वरिष्ठ अधिकारी सरकारचे प्रवक्ते;तमिळनाडू सरकारचा निर्णय, उच्च पदावरील व्यक्तींची पहिल्यांदाच नियुक्ती

Thane News: एमआयडीसी रस्ता बनला स्विमिंग पूल, नागरिकाचं पाण्यात पोहत अनोखं आंदोलन

Palghar News : पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची यांत्रिकी शेतीकडे वाटचाल; गतवर्षी जिल्ह्यात 24 हेक्टरने भात लावणीच्या क्षेत्रात वाढ

Ashok Gajapathi Raju: गोव्याच्या राज्यपालपदी गजपथी राजू यांची नियुक्ती

SCROLL FOR NEXT