देश

अमरनाथ यात्रेबद्दल अनिश्‍चितता; कोरोनामुळे कालावधी कमी करण्याचा प्रस्ताव 

वृत्तसंस्था

श्रीनगर - अमरनाथ यात्रेला २२ जूनपासून सुरुवात होणार आहे. मात्र कोरोनामुळे यात्रा होणार की नाही, हे अद्याप निश्‍चित झालेले नाही. अमरनाथ तीर्थक्षेत्र मंडळाने यात्रेचा कालावधी १५ दिवसांचा करण्याचा प्रस्ताव दिला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

दरवर्षीप्रमाणे यंदाही अमरनाथ येथील गुहेत बर्फातील शिवलिंग साकारले आहे. त्याची छायाचित्र नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. छायाचित्रांमध्ये सर्वत्र बर्फ दिसत असून गुहेत बर्फाचे शिवलिंग तयार झालेले दिसत आहे. कोरोनामुळे यंदा यात्रा रद्द केल्याचे निवेदन मंडळाने २२ एप्रिल रोजी दिले होते. मात्र नंतर ते मागे घेण्यात आले. त्याऐवजी यात्रेची मुदत १५ दिवस करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. यात्रा बालताल मार्गावरुन सुरु व्हावी, असेही या प्रस्तावात म्हटले आहे. यात्रेचा पारंपरिक मार्ग पहलगाम, चंदनवाडी, शेषनाग, पंचतरणी असा आहे. 

यंदा यात्रेतील अडथळे 
- जम्मू-काश्‍मीरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या ४००पेक्षा जास्त. 
- काश्‍मीर खोऱ्यात कोरोनाचा मोठा प्रसार. 
- नियोजित कार्यक्रमानुसार एक एप्रिलपासून नोंदणी सुरु होणे आवश्‍यक होते. 
- यात्रेच्या एक महिना आधी मार्गावरील बर्फ हटविण्यास सुरुवात होते, पण आत्ताही तेथे मोठ्या प्रमाणात बर्फ साठलेले आहे. 

इतर बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

गेल्या काही वर्षांतील यात्रेकरूंची संख्या (आकडे लाखात) 
२०१९- ३.५० 
२०१८ - २.८५ 
२०१७- २.६० 
२०१६ - २.२० (याच वर्षी दहशतवादी बुऱ्हाण वणी चकमकीत मारला गेल्याननंतर परिस्थिती खराब झाली होती) 
२०१५- ३.५२ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Audio Clip: उद्घाटनाच्या कार्यक्रमाला 70 हजार रुपये; हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाचा रेट फिक्स! ऑडिओ क्लिप व्हायरल

हृदयद्रावक! ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या संघातील फुटबॉलपटू Diogo Jota चा कार अपघातात मृत्यू, १० दिवसांपूर्वीच झालं होतं लग्न

Thackeray Rally: मुंबईत ५ जुलैला ठाकरे बंधूंची संयुक्त रॅली, तयारीसाठी बैठकांचा सपाटा, पण अजून पोलिसांची परवानगी नाही

Nashik Police Transfers : नाशिक पोलिस उपायुक्तांच्या बदल्या; नवीन नियुक्तीला उशीर का?

‘गुलाबी साडी’ फेम संजू राठोडची मराठी गाणी बॉलिवूडमध्ये झळकणार....

SCROLL FOR NEXT