prime minister Narendra Modi prime minister Narendra Modi
देश

आंध्र प्रदेश : आंदोलकांनी पंतप्रधानांच्या हेलिकॉप्टरजवळ उडवले काळे फुगे

सकाळ डिजिटल टीम

हैदराबाद : आंध्र प्रदेशमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची सुरक्षा भेदल्याचे एक मोठे प्रकरण समोर आले आहे. पंतप्रधानांच्या हेलिकॉप्टरजवळ (helicopter) काळे फुगे दिसले. निषेध म्हणून हे फुगे सोडण्यात आल्याचे बोलले जात आहे. मात्र, याबाबत सुरक्षा अधिकाऱ्यांकडून अद्याप काहीही सांगण्यात आलेले नाही.

प्राप्त माहितीनुसार, हे फुगे काँग्रेस (Congress) कार्यकर्त्यांनी सोडले. मोठ्या प्रमाणात हे फुगे आकाशात दिसले. याआधी पंजाब विधानसभा निवडणुकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सुरक्षा भेदल्याची घटना घडली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) पठाणकोटमध्ये रॅलीसाठी जात होते. परंतु, वाटेत त्यांच्या ताफ्याला अडवले होते.

यानंतर आंदोलकांनी घेरलेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सुरक्षा काफिला तेथून परतला होता. या मुद्द्यावर केंद्र सरकारने पंजाब सरकारकडून उत्तरही मागवले होते. नंतर पंजाबच्या तत्कालीन काँग्रेस सरकारनेही याबाबत खंत व्यक्त केली होती.

पंतप्रधान मोदींचे हेलिकॉप्टर जिथून टेकऑफ होणार होते तेथे काँग्रेस कार्यकर्ते आंदोलन करीत होते. त्यांच्या हातात काळे फुगे आणि फलक होते. ते पंतप्रधान मोदींवर निशाणा साधत घोषणाबाजी करीत होते.

काँग्रेसच्या तीन कार्यकर्त्यांनी पंतप्रधानांच्या हेलिकॉप्टरपासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावरून फुगे सोडले होते. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून, गुन्हाही दाखल करण्यात आला आहे, असे विजयवाडा आयुक्त कांठी राणा यांनी सांगितले. अल्लुरी सीताराम राजू यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पंतप्रधान आंध्र प्रदेशात पोहोचले होते. त्यांनी आदिवासी स्वातंत्र्यसैनिकाच्या ३० फूट उंच पुतळ्याचे अनावरण केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bonus Rule: Bonus Rule: कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! 20 टक्यांपर्यंत बोनस मिळणार; कुणाला होणार फायदा?

पंजाब नॅशनल बँकेच्या तिजोरीत तब्बल १७ कोटी २९ लाख रुपयांच्या बनावट नोटा; मॅनेजरला अटक, तीन कर्मचारीही निलंबित

Gokul Dudh Election Date : ‘गोकुळ’च्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला? ऑक्टोबर महिन्यात मतदान, मतमोजणी होणार

स्टार प्रवाहच्या 'मी कात टाकली'मध्ये दिसणार नवा चेहरा; कोण आहे हा अभिनेता? नवा प्रोमो चर्चेत; 'ही' मालिका घेणार निरोप

Marathi News Live Updates : पुण्यात एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांने उचलले टोकाचं पाऊल

SCROLL FOR NEXT