Narendra Modi and prithviraj chavan 
देश

आम्ही 'इंडिया' आहोत याचा अभिमान, तुम्ही...: पृथ्वीराज चव्हाण यांचे मोदींच्या टीकेला प्रत्युत्तर

रवींद्र देशमुख

मुंबई - विरोधी पक्षांनी केंद्रातील भाजप सरकारशी दोन हात करण्यासाठी नव्या आघाडीची घोषणा केली आहे. या आघाडीत २६ पक्ष सामील झाले असून या आघाडीला इंडिया इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट इन्क्लुझिव्ह अलायंस) असे नाव देण्यात आले आहे. यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार टीका केली होती. त्याला काँग्रेसनेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी नावावरुन चर्चा करणं हास्यास्पद आहे. आता लढाई विचारांची आहे. विचारांची लढाई आहे तर विचारांवर बोला. मात्र त्यावर बोलायची तुमची हिम्मत नाही. शिवाय मणिपूरच्या घटनेवर बोलायची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हिम्मत नाही, असंही चव्हाण म्हणाले.

दरम्यान मोदींनी इंडिया नावावरून केलेल्या टीकेवर चव्हाण म्हणाले की, आम्ही इंडिया आहोत याचा आम्हाला अभिमान आहे. मोदींनी इंडिया नावावरून कुरापत केली तरी त्याचा उपयोग होणार नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इंडियावर टीका करताना म्हटलं होतं की, केवळ इंडिया हे नाव ठेवल्याने काही होत नाही. ईस्ट इंडिया कंपनीमध्येही इंडिया होते. इंडियन मुजाहिद्दिनच्या नावातही इंडिया आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Minister Narhari Zirwal : मंत्री झिरवाळांच्या बालेकिल्ल्यातच ACB ची 'रेड'; महिला सरपंचाला लाच घेताना रंगेहाथ पकडलं, 50 हजारांची मागणी अन् 15 हजारांत...

Pune APMC: पुणे बाजार समितीतील गैरव्यवहाराची चौकशी पूर्ण करा; विरोधक आक्रमक, अहवाल सादर करण्याचे आदेश!

CJI Suryakant सकाळी पेपर… संध्याकाळी याचिका! सीजेआय सूर्यकांत यांच्या एका वाक्याने उघड झाला मोठा ‘खेळ’

T20 World Cup: दक्षिण आफ्रिका - वेस्ट इंडीज सामनाच ठरवणार भारताचं भविष्य! जाणून घ्या सर्व शक्यता अन् समीकरणं

Mumbai Pune Expressway traffic: मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांची महाकोंडी! पुण्याच्या दिशेने जाणारा मार्ग ठप्प, प्रवास ठरतोय शिक्षा!

SCROLL FOR NEXT