PSLV-C51
PSLV-C51 
देश

‘पीएसएलव्ही-सी ५१’ प्रक्षेपणासाठी सज्ज

पीटीआय

बंगळूर - भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) उद्या (ता. २८) ‘पीएसएलव्ही सी-५१’ या प्रक्षेपकाद्वारे १९ उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यासाठी सज्ज झाली आहे. श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रावरून सकाळी १० वाजून २४ मिनीटांनी हे प्रक्षेपण नियोजित आहे. 

ब्राझीलच्या ॲमेझोनिया-१ या उपग्रहाला घेऊन ‘पीएसएलव्ही सी-५१’ अवकाशात जाणार आहे. त्याशिवाय इतर १८ उपग्रहांनाही अवकाशातील त्यांच्या नियोजित कक्षेत सोडले जाणार आहे. या मोहिमेद्वारे एकूण २० उपग्रह सोडले जातील, असे आधी जाहीर करण्यात आले होते. मात्र, ‘पिक्सल’ या भारतातील स्टार्ट अप कंपनीने सॉफ्टवेअरमधील बिघाडामुळे त्यांच्या ‘आनंद’ या उपग्रहाचे प्रक्षेपण रद्द केले. यानंतर आयएनएस-२ डीटी हा आपला नॅनो उपग्रहही या मोहिमेत सहभागी होणार नसल्याचे ‘इस्रो’ने जाहीर केले. या उपग्रहात काही तांत्रिक त्रुटी राहिल्याने हा निर्णय घेतल्याचे ‘इस्रो’चा व्यावसायिक विभाग असलेल्या न्यू स्पेस इंडिया लिमिटेडचे (एनएसआयएल) अध्यक्ष जी. नारायणन यांनी सांगितले. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘एनएसआयएल’साठी ‘पीएसएलव्ही सी-५१’ची ही पहिलीच संपूर्ण व्यावसायिक मोहिम आहे. अमेरिकेतील ‘सियाटल’ आणि ‘स्पेसफ्लाइट’ या कंपन्यांच्या सहकार्याने ती राबविली जाणार आहे.

उपग्रहांची माहिती 
ॲमेझोनिया-१ (ब्राझील) : ६३७ किलो वजन, ऑप्टीकल अर्थ ऑब्झर्वेशन
इन स्पेस संस्थेतर्फे चार उपग्रह (यापैकी तीन भारतीय शैक्षणिक संस्थांचे तीन ‘युनिटी सॅट’ आणि स्पेस किड्‌झ इंडियातर्फे एक ‘सतीश धवन सॅट’)
एनएसआयएल’चे १४ उपग्रह 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT