CM Bhagwant Mann esakal
देश

Punjab : पंजाबचे मुख्यमंत्री, राज्यपालांना बॉम्बने उडवण्याची धमकी

सकाळ डिजिटल टीम

पत्रात शाळकरी मुलाच्या इंग्रजी नोटबुकच्या पानावर हिंदी भाषेत धमकी लिहिलीय.

चंदीगड : पंजाबात (Punjab) नुकत्याच निवडणुका पार पडल्या असून तिथं आपचं सरकार (AAP Government) स्थापन झालंय. त्यातच आता पंजाबचे मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांना बॉम्बनं उडवण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आलीय. मुख्यमंत्री भगवंत मान (CM Bhagwant Mann) आणि राज्यपाल बनवारीलाल पुरोहित (Governor Banwarilal Purohit) यांच्यासह राज्यातील अनेक रेल्वे स्टेशन उडवले जातील, अशी धमकी देण्यात आलीय.

कपूरथला स्टेसनच्या डीआरएमला हे पत्र पाठवण्यात आलंय. मिळालेल्या अधिक माहितीनुसार, हे पत्र जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेनं लिहिलंय. राज्यातील सुलतानपूर लोधी, लोहियान खास, फिरोजपूर कॅन्टोन्मेंट, फगवाडा, अमृतसर आणि तरनतारनसह अनेक रेल्वे स्थानके उडवून देण्याची धमकी पत्रात दिली आहे. मात्र, त्यावर कोणत्याही तारखेचा किंवा दिवसाचा उल्लेख केलेला नाहीय. पत्र वाचून सुलतानपूर लोधी रेल्वे स्थानकाच्या (Sultanpur Lodhi Railway Station) कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली. याची गांभीर्यानं दखल घेत स्टेशन मास्तरांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना योग्य सुरक्षा व्यवस्था करण्याची मागणी केलीय. पत्रात शाळकरी मुलाच्या इंग्रजी नोटबुकच्या पानावर हिंदी भाषेत धमकी लिहिलीय.

सुलतानपूर लोधी रेल्वे स्टेशनचे स्टेशन मास्तर राजबीर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी 2.15 च्या सुमारास एक पोस्टमन पत्र घेऊन स्टेशनवर पोहोचला आणि हे पत्र पर्यवेक्षक विकास कुमार यांना मिळाले. पत्रावर त्यांचे (स्टेशन मास्तर) नाव लिहिले होते, म्हणून ते पत्र घेऊन लगेच त्यांच्याकडे आले. त्यांनी पत्र उघडून ते वाचले तेव्हा एका पानावर दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा (Jaish-e-Mohammed) एरिया कमांडर सलीम अन्सारी, जम्मू-काश्मीरसह कराची पाकिस्तान, जैश जिंदाबाद आणि पाकिस्तान जिंदाबाद असं लिहिलं होतं. दुसऱ्या पानावर 'खुदा मला माफ कर, आम्ही आमच्या जिहाद्यांच्या मृत्यूचा बदला नक्कीच घेऊ, आम्ही जालंधर रेल्वे स्टेशन, सुलतानपूर लोधी-लोहियान खास, फिरोजपूर कॅन्टोन्मेंट, फगवाडा, अमृतसर आणि तरणतारनसह पंजाबच्या अनेक रेल्वे स्थानकांसह जालंधरमधील देवी तालाब मंदिर, पियाला येथील काली माता मंदिर, फगवाडा येथील हनुमानगढी, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, राज्यपाल, फिरोजपूर रेल्वे महाव्यवस्थापक सीमा शर्मा यांच्यासह अकाली दलाच्या नेत्यांना ठार मारणार आहोत,' असं या पत्रात लिहिलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Death: धक्कादायक घटना! उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन

Pune News: मावळमध्ये राष्ट्रवादी-भाजपमध्ये थेट लढत; पंधरा जागांसाठी ४० जण रिंगणात, जिल्हा परिषदेचे १३, पंचायत समितीचे २७ उमेदवार!

Baramati Plane Crash : अजित पवारांच्या विमानाचा अपघात, ६ जणांचा मृत्यू; DGCAने दिले अपडेट्स

Ajit Pawar Plane Crash : मोठी बातमी ! अजित पवार यांच्या विमानाला भीषण अपघात, ६ प्रवाशांचा मृत्यू, बारामतीत लॅंडिंग दरम्यान दुर्घटना

Solapur politics: साेलापूर जिल्ह्यात ६८ जागांसाठी २७१ उमेदवार रिंगणात; पंचायत समितीच्या १३६ जागांसाठी ४८५ जणांनी थोपटले दंड; मातब्बरांची माघार!

SCROLL FOR NEXT