देश

पंजाब : 'आप'चा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार शीख असेल - केजरीवाल

सूरज यादव

केजरीवाल म्हणाले की, कुंवर विजय प्रताप हे राजकारणी नाहीत. त्यांना सर्वसामान्यांचा पोलिसवाला म्हटलं जात होतं.

लुधियाना - विधानसभा निवडणुकीच्या आधी पंजाबमध्ये राजकीय वातावरण तापलं आहे. एका बाजुला काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफूस सुरु आहे. तर दुसरीकडे आम आदमी पक्षाचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री राज्याच्या दौऱ्यावर आहेत. अकाली दलाने भाजपशी काडीमोड केल्यानंतर बसपाशी हात मिळवला आहे. दरम्यान, अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीत माजी आयजी कुंवर प्रताप विजय यांनी आपमध्ये प्रवेश केला आहे.

आम आदमी पक्षाचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार हा शीख समुदायातील असेल अशी घोषणा केजरीवाल यांनी केली. अख्ख्या पंजाबला त्याच्यावर गर्व असेल असंही केजरीवाल यावेळी म्हणाले. कुंवर विजय प्रताप यांच्या पक्षप्रवेशानंतर बोलताना केजरीवाल म्हणाले की, कुंवर विजय प्रताप हे राजकारणी नाहीत. त्यांना सर्वसामान्यांचा पोलिसवाला म्हटलं जात होतं. आपण सर्वजण इथं देशाची सेवा करण्यासाठी आहोत. यासाठी त्यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला असल्याचं केजरीवाल यांनी म्हटलं.

पंजाबच्या राजकारणात ही मोठी घटना असल्याचं म्हटलं जात आहे. माजी आयजी कुंवर विजय प्रताप हे 1998 च्या बॅचचे आय़पीएस अधिकारी आहेत. त्यांनी कोटकपूरा प्रकरणाचा तपास केला होता. विशेष तपास पथकातील ते वरिष्ठ सदस्य होते. एसआयटीचा रिपोर्ट पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने फेटाळून लावून नव्या एसआयटीची स्थापना करण्याचे आदेश दिले होते. यानंतर कुंवर विजय प्रताप यांनी स्वेच्छा निवृत्ती घेण्यासाठी अर्ज केला होता. त्याला आधी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी फेटाळलं होतं. मात्र नंतर स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज स्वीकारला होता.

स्वेच्छानिवृत्तीनंतर कुंवर विजय प्रताप सिंह हे राजकारणात येतील अशी चर्चा सुरु होती. निवडणुका जवळ येताच या चर्चेला उधाण आले होते. अखेर सोमवारी आपमध्ये प्रवेश केल्यानंतर चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain News : झाडं रस्त्यावर पडल्यानं बेस्टचा खोळंबा, डझनभर मार्ग बदलले; प्रवाशांचे प्रचंड हाल

Pudina Rice Recipe: नॉन-व्हेजलाही विसरायला लावेल गरमागरम पुदीना राईस; पावसाळ्यात लंचसाठी एकदा नक्की ट्राय करा

Marathi Live Updates : मुसळधार पावसाने अंबा नदीचा जोडरस्ता जलमय, राज्य महामार्गावरील वाहतूक ठप्प

Tukaram Mundhe Water Inspection : तुकाराम मुंढेंना आता वेगळं काम; हॉटेलमध्ये मिळणारे जारमधील पाणी तपासणार, एसओपी तयार करण्याचे निर्देश

Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीला पदार्पणाची बातमी समजताच सर्वात आधी कोणाला फोन केला? स्वतःच केला खुलासा

SCROLL FOR NEXT