court esakal
देश

महिलेच्या विवाहबाह्य संबंधामुळे मुलांचा ताबा नाकारु शकत नाही- हायकोर्ट

कार्तिक पुजारी

एका कौटुंबिक वादाप्रकरणी चंदीगड हायकोर्टाने महत्त्वाची टिप्पणी केली आहे. महिलेचे विवाहबाह्य संबंध आहेत, या आधारावर तिला वाईट आई ठरवता येणार नाही. तसेच मुलाचा ताबा तिला नाकारता येणार नाही, असं कोर्टानं म्हटलं आहे.

चंदीगड- एका कौटुंबिक वादाप्रकरणी चंदीगड हायकोर्टाने महत्त्वाची टिप्पणी केली आहे. महिलेचे विवाहबाह्य संबंध आहेत, या आधारावर तिला वाईट आई ठरवता येणार नाही. तसेच मुलाचा ताबा तिला नाकारता येणार नाही, असं कोर्टानं म्हटलं आहे. पितृसत्ताक समाजामध्ये महिलेच्या चरित्रावर प्रश्न उपस्थित करुन तिला वाईट ठरवलं जातं. अनेकदा महिलेवरील अशा आरोपांचा काहीही आधार नसतो, असंही कोर्टाने म्हटलं. (punjab and haryana high court said cant deny woman kids custody due to extramarital affair )

महिलेचे विवाहबाह्य संबंध असले तरी ती एक वाईट आई आहे असं होऊ शकत नाही. त्यामुळे तिला मुलाचा ताबा नाकरला जाऊ शकत नाही, असं न्यायमूर्ती अनुपींदर सिंग ग्रेवाल म्हणाले. पंबाजमधील फतेगड साहेबच्या एका महिलेने हबिस कॉर्पस याचिका कोर्टात दाखल केली होती. ही महिला सध्या ऑस्ट्रेलियाची नागरिक आहे. हायकोर्टाने साडेचार वर्षाच्या मुलाचा ताबा महिलेला सोपवण्याचा निर्णय घेतला आहे.

महिलेने याचिकेमध्ये सांगितलं की, तिने 2013 मध्ये लग्न केले होते. तिचा पती मुळचा लुधियानाचा आहे, पण सध्या ऑस्ट्रेलियाचा नागरिक आहे. महिलाही नंतर ऑस्ट्रेलियात गेली होती आणि दोघांना 2017 साली एक मुलगी झाली. पुढील काळात त्यांच्यात वाद निर्माण झाला. 2020 मध्ये ते जेव्हा भारतात आले, त्यावेळी ते वेगळे झाले. पण, पतीने मुलीला आपल्याजवळ ठेवले. त्यानंतर महिला आपल्या सासरी राहायला गेली.

पतीने दावा केला होता की, मुलगी त्याच्यासोबत राहत असून तिची काळजी घेण्यासाठी तिचे आजी-आजोबा आहेत. गेल्या एक वर्षापासून मुलगी माझ्यासोबत राहत आहे. त्यामुळे एकट्या राहणाऱ्या तिच्या आईकडे मुलीचा ताबा देऊ नये. कोर्टाने पतीची मागणी फेटाळली असून मुलीचा ताबा महिलेकडे सोपवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT