punjab election
punjab election sakal
देश

Punjab: २५ टक्के उमेदवार गुन्हेगारीने कलंकित; बहुतांश संपत्तीने गडगंज

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : पंजाब विधानसभा विधानसभेच्या रणधुमाळीत उतरलेल्या १२७६ उमेदवारांपैकी किमान २५ टक्के उमेदवारांनी आपल्यावर गंभीर-अतिगंभीर गुन्हे दाखल असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. पंजाबात (Punjab Election 2022) २० फेब्रुवारीला मतदान होणार आहे. रिंगणात असलेल्या १३०४ पैकी १२७६ उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रांची छाननी केल्यावर हे वास्तव समोर आले आहे. (Punjab Assembly Election 2022)

असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) शी संबंधित पंजाब इलेक्शन वाच (पीईडब्ल्यू) यांनी ही पाहणी केली. २८ उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रांचे स्कॅनिंग नीट केलेले नाही किंवा आयोगाच्या संकेतस्थळावरील सर्व माहिती दिलेली नाही. त्यामुळे १२७६ उमेदावारांबाबतची माहिती उपलब्ध झाली आहे, असे पीईडब्ल्यूचे प्रदेश संयोजक जसकीर्त सिंह यांनी स्पष्ट केले. पंजाबमध्ये १२ वीच्या पुढे न गेलेले निम्म्यापेक्षा जास्त उमेदवार आहेत. मात्र संपत्तीच्या बाबतीत बहुतांश उमेदवारांची स्थिती ‘दणदणीत' आहे.

पंजाबातील (Punjab Election) सर्वपक्षीय उमेदवारांकडे सरासरी प्रत्येकी ४. ३१ कोटींची माया आहे. २०१७ मधील विधानसभा निवडणुकीवेळी राज्यातील उमेदवारांची सरासरी संपत्ती ३.४९ कोटी होता यंदा त्यात वाढ झाली आहे. श्रीमंत उमेदवारांत आम आदमी पक्षाचे मोहालीचे उमेदवार कुलवंतसिंग यांनी त्यांच्याकडे सर्वाधिक म्हणजे २३८ कोटींची घोषित संपत्ती असल्याचे म्हटले आहे. शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीरसिंग बादल, कॉंग्रेसचे मुक्तसरचे उमेदवार करण कौर बराड यांच्याकडे अनुक्रमे २०२ कोटी व १५५ कोटींची संपत्ती आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Update: पुण्यात तूर्तास पाणीकपात नाही; महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांचं स्पष्टीकरण..

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी पुन्हा उपसलं उपोषणांचं हत्यार; या तारखेपासून ‘सगेसोयरे‘साठी पुन्हा सुरू करणार आंदोलन

IPL 2024 प्लेऑफपूर्वी गंभीरच्या कोलकाताला मोठा धक्का, स्टार सलामीवीरने अचानक सोडली संघाची साथ

Rinku Singh: फ्लावर नहीं फायर है... केकेआरच्या रिंकू सिंगचा 'पुष्पा-पुष्पा' गाण्यावर जबरदस्त डान्स, व्हिडीओ व्हायरल

Melinda Gates: मेलिंडा गेट्स यांनी गेट्स फाऊंडेशनचा दिला राजीनामा; पुढील कामासाठी मिळणार 1,00,000 कोटी रुपये

SCROLL FOR NEXT