Congress
Congress esakal
देश

पंजाब काँग्रेसला मोठा धक्का; दोन आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश

सकाळ डिजिटल टीम

पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अगोदर पंजाब (Punjab) काँग्रेसला मोठा धक्का (Big blow to Congress) बसला आहे. मंगळवारी काँग्रेसच्या दोन विद्यमान आमदारांनी नवी दिल्लीत भाजपमध्ये प्रवेश केला. फतेह जंग बाजवा (Fateh Jung Bajwa) आणि बलविंदर सिंग लड्डी (Balwinder Singh Laddi) यांनी भाजपमध्ये प्रवेश केला (Two MLAs join BJP) आहे. बाजवा हे कादियानचे विद्यमान आमदार आहेत, तर लड्डी हे श्री हरगोबिंदपूरचे आमदार आहेत. दोन नेत्यांनी पक्ष सोडल्यानंतर पंजाब काँग्रेसमधील अस्वस्थता पुन्हा चव्हाट्यावर आली आहे.

फतेह जंग हे पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार प्रताप सिंग बाजवा यांचे भाऊ आहे. लड्डीही बाजवाशी संबंधित आहे. भाजपचे पंजाब निवडणूक प्रभारी आणि केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या उपस्थितीत दोघांनी भाजपमध्ये प्रवेश (Two MLAs join BJP) केला. विशेष म्हणजे पंजाब प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रमुख नवज्योत सिंग सिद्धू यांनी गेल्या आठवड्यात झालेल्या राजकीय सभांमध्ये या आमदारांच्या उमेदवारीचे जोरदार समर्थन केले होते.

प्रताप सिंग बाजवा यांनी कादियानमधून विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्याने फतेह जंग संतापले होते. प्रताप यांच्याशी झालेल्या वादात नवज्योतसिंग सिद्धू यांनी फतेह जंग यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला होता. प्रताप बाजवा तिथून निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याने या मतदारसंघात दोन भावांमध्ये निवडणूक लढण्याची शक्यता आहे, असे आता मानले जात आहे. फतेहजंग आणि लड्डी हे दोघेही पहिल्यांदाच आमदार झाले आहेत.

खरं तर, नुकत्याच झालेल्या एका रॅलीत काँग्रेसचे पंजाब अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनी फतेह जंग यांना कादियानमधून पक्षाचे उमेदवार म्हणून घोषित केले होते. मात्र, त्या घोषणेनंतर लगेचच प्रताप बाजवा यांनी आपणही याच जागेसाठी इच्छुक असल्याचे आपल्या पक्षाला स्पष्ट केले. वृत्तांवर विश्वास ठेवला तर, फतेह जंग, तिकीट मिळविण्याच्या शर्यतीत आपला भाऊ प्रताप बाजवा यांच्याकडून पराभूत होईल या अपेक्षेने, म्हणून निवडणुकीपूर्वी पक्ष बदलण्याचा निर्णय घेतला. आता सिद्धू हे पंजाब काँग्रेसचे (Congress) अध्यक्ष असल्याने कादियानमधून प्रताप बाजवा यांना तिकीट देण्यावरून पक्षात आणखी एक भांडण होऊ शकते. या सगळ्यात सध्या प्रताप बाजवा बाजूला वाटत आहेत, ज्यांच्या तिकिटाची पक्षाने अधिकृत घोषणा केलेली नाही.

हेही भाजपमध्ये दाखल

माजी क्रिकेटपटू दिनेश मोंगिया आणि तीन वेळा शिरोमणी अकाली दलाचे बलुआनाचे आमदार गुरतेज सिंग गुधियाना यांनीही विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला. याशिवाय संगरूरचे माजी खासदार राजदेव खालसा, युनायटेड ख्रिश्चन फ्रंट पंजाबचे अध्यक्ष कमल बक्षी, निहाल सिंग वाला महानगरपालिका सदस्य जगदीप सिंग धालीवाल आणि निवृत्त एडीसी आणि पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयातील वकील मधुमीत यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT