Pakistan Drone Sakal
देश

अंमली पदार्थाची तस्करी करणारे पाकिस्तानी ड्रोन भारतीय जवानांनी पाडले

पंजाबमधील अमृतसर सेक्टरमधील धानोन कलान गावाजवळ हा प्रकार घडला आहे.

दत्ता लवांडे

नवी दिल्ली : पंजाबमधील अमृतसरमध्ये पाकिस्तानी ड्रोन घुसल्याचा प्रकार उघडकीस आला असून, दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास भारतीय सैन्यदलांकडून हे ड्रोन पाडण्यात आलं आहे. अमृतसर सेक्टरमधील धानोन कलान गावाजवळ हा प्रकार घडला आहे.

भारताच्या हवाई सीमेवर पाकिस्तानच्या बाजूने काहीतरी संशयास्पद हालचाल होत असल्याची माहिती भारतीय सैन्यदलाला मिळाली आणि त्यानंतर सैनिकांकडून गोळीबार करत हा ड्रोन खाली पाडण्यात आला आहे. ड्रोन खाली पडल्यानंतर भारतीय जवानांनी ताब्यात घेऊन त्याची माहिती मिळवली आहे. ताब्यात घेण्यात आलेले ड्रोन हे चीनी बनावटीचे असून DJI Matrice 300 असं या ड्रोनचं नाव असल्याचं माहितीतून समोर आलं आहे.

पाडण्यात आलेल्या ड्रोनद्वारे अंमली पदार्थांची तस्करी होत असल्याची माहिती भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी दिली आहे. पण पाकिस्तानचा हा प्रयोग जवानांनी हाणून पाडला आहे.

दरम्यान गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तानकडून भारतीय हद्दीत घुसण्याचे अनेक प्रयत्न केले जात आहेत, मात्र प्रत्येक वेळी बीएसएफच्या सतर्क जवानांनी पाकिस्तानचा हा प्रयत्न हाणून पाडला आहे. काही दिवसांपूर्वी अटारीवरून एक पाकिस्तानी ड्रोन उडताना भारतीय लष्करांना दिसले होते. हे ड्रोन भारतीय सीमा ओलांडत असताना सुमारे 5 किलोमीटर आत आले होते. यापूर्वी 21 एप्रिल रोजी गुरुदासपूर सेक्टरमध्ये 4 वेळा ड्रोनद्वारे घुसखोरीचा प्रयत्न पाकिस्तानकडून करण्यात आला होता. त्याला मारण्यासाठी बीएसएफला सुमारे 165 राउंड फायर करावे लागले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Divya Shinde Pune Case: ‘बिग बॉस फेम’ दिव्या शिंदेचा पुण्यात राडा! ६५ वर्षीय डॉक्टरांच्या घरात घुसून काठ्या-बेल्टने मारहाण, प्रकरण काय?

Konkan Railway: मुंबई-गोवा प्रवासासाठी कोकण रेल्वेचा नवा पर्याय, विशेष गाड्यांची घोषणा; पाहा वेळापत्रक आणि थांबे

जयगड-चिपळूण-सातारा महामार्गाला वेग, ९८ किलोमीटरच्या मार्गाच्या अहवालाची प्रक्रिया; सल्लागार नियुक्तीसाठी निविदा

'आम्हाला अधिकारी व्हायचंय, तुम्ही फक्त शिक्षक द्या'; बीडच्या ZP शाळेतील मुलींची रिपोर्टिंग करत मुख्यमंत्र्यांना आर्त हाक

Latest Marathi News Live Update : गंगा एक्स्प्रेसवेवर पाणीच पाणी; आमदारांची गाडी अपघातग्रस्त

SCROLL FOR NEXT